पुणे

संगमनेरात ६.७० लाखांची दिवसाढवळ्या लूट

CD

टुडे एकसाठी
संगमनेरात धूमस्टाईलने
पावणेसात लाखांची लूट

दुचाकीवरील चोरटे ‘सीसीटीव्ही’त कैद

संगमनेर, ता. १३ ः धान्य व प्लायवूड दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीकडील ६ लाख ७० हजार रुपयांच्या रकमेची दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी दिवसाढवळ्या लूट केली. ही घटना सोमवारी (ता. ११) दुपारी चार वाजेच्या सुमारास नाशिक–पुणे महामार्गावरील घुलेवाडी (ता. संगमनेर) परिसरात घडली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, घुलेवाडी परिसरात प्रफुल्ल राजमल बोगावत यांचे ‘शीतल मार्केट’ नावाचे धान्य व प्लायवूड दुकान आहे. येथे विलास बोऱ्हाडे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दुकानमालक बोगावत आणि व्यवस्थापक बोऱ्हाडे हे वेगवेगळ्या दुचाकींवरून घुलेवाडी येथील अमृतवाहिनी बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बोगावत यांनी बँकेतून ३ लाख रुपये काढले. त्यांच्याकडील आणखी ३ लाख रुपये, असे एकूण ६ लाख रुपये त्यांनी बोऱ्हाडे यांच्याकडे दिले. त्यामध्ये दुकानातील ७० हजार रुपये मिळून एकूण ६ लाख ७० हजार रुपये बोऱ्हाडे यांनी मर्चंट बँकेच्या घुलेवाडी शाखेत भरण्यासाठी ताब्यात घेतले होते.
दुपारी चार वाजेच्या सुमारास बोऱ्हाडे दुकानातून बँकेत जात असताना दुकानाजवळच दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी पाठीमागून येत पैशांची पिशवी हिसकावून घेतली आणि तेथून पळ काढला. बोऱ्हाडे यांनी त्यांचा पाठलाग केला; मात्र ते पसार झाले. हा संपूर्ण प्रकार, तसेच चोरट्यांच्या हालचाली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाल्या आहेत. याप्रकरणी व्यवस्थापक विलास बोऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Ajinkya Rahane ने बुडणारं जहाज वाचवलेलं, पण त्याला श्रेय मिळालं नाही...', गावसकरांचा भारतीय क्रिकेटवर निशाणा

Jayakwadi Dam Water Release: जायकवाडी नाथसागर धरणातून गोदावरीत १० हजार क्युसेक विसर्ग; नदीपात्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

MS Dhoni: रेसिंग ट्रॅकवर 'माही'चा जलवा! मद्रास सर्कीटवर धोनीने पळवली सुपरबाईक, Video तुफान Viral

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये येणार ‘पिंक प्लॅटफॉर्म’! महिला प्रवाशांसाठी मोठा निर्णय; कसा असणार उपक्रम?

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत मोठी कारवाई! विद्यार्थ्यांवर ड्रग्जमाफियांचा डोळा, ४१.६० लाखांच्या अमली पदार्थांसह तस्कर जेरबंद

SCROLL FOR NEXT