पुणे

जिल्हा बँकेच्या मतदान केंद्रावर ढाकणे विरुद्ध थोरात गट

CD

तालुका ः संगमनेर
........................
GHR26A09638
संगमनेर : मतदानाच्या व्हिडिओवरून झालेल्या वादानंतर प्रताप ढाकणे मतदान केंद्रावर संताप व्यक्त करताना.


ढाकणे विरुद्ध थोरात गट

मतदानाचा व्हिडिओ व्हायरल; काही काळ तणावपूर्ण वातावरण

संगमनेर, ता. २ : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २) संगमनेर शहरातील मतदान केंद्रावर प्रक्रिया सुरू असताना, मतदान केल्यानंतर मतदाराने कोणाला मतदान केले, हे दर्शविणारा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली. या प्रकाराची माहिती मिळताच परिवर्तन पॅनलचे प्रताप ढाकणे यांनी थेट मतदान केंद्रावर धाव घेत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी त्यांनी मतदान केंद्रातच आक्षेप नोंदवत संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे थोरात गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. दोन्ही गटांत शाब्दिक वाद झाल्याने काही काळ मतदान केंद्र परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी संगमनेर शहरातील एका विद्यालयात मतदान प्रक्रिया सुरू होती. याचदरम्यान मतदानाचा व्हिडिओ प्रसारित झाल्याचे समोर आले. या प्रकाराची दखल घेत प्रताप ढाकणे मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे या प्रकाराबाबत विचारणा केली. ‘‘जिल्ह्यातील गुलामगिरी संपवा. ही दादागिरी संपवा. मतदान कोणालाही करा; मात्र अशा प्रकारांना थारा देऊ नका,’’ असे म्हणत ढाकणे यांनी संताप व्यक्त केला.

त्यावर थोरात गटाच्या कार्यकर्त्यांनी, ‘‘हा व्हिडिओ कधीचा आहे? तुम्ही उमेदवार नाही, मतदारही नाही. मग मतदान केंद्रात येऊन हस्तक्षेप करण्याचा अधिकार काय?’’ असा प्रश्न उपस्थित केला. दादागिरी चालणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Change Health Tips: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी; बदलत्या हवामानात आजारी पडू नये म्हणून करा ५ गोष्टी!

Lanja Machal ST Bus Service Historic Event : स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर कोकणातील ३५०० फूट उंचीवरील दुर्गम 'माचाळ' गावात पहिल्यांदाच धावली लालपरी

मला लहानपणापासूनच लग्न करायचं होतं पण... अजूनही अविवाहित का आहे ३४ वर्षांची वैदेही परशुरामी? म्हणते- मी प्रेमात पडले...

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेतील तारण कर्जाचे सोने बनावट, गोपीचंद पडळकरांचा आरोप

FD Rates: सरकारी बँकेने FD वरील व्याजदर वाढवले; नवीन योजनाही सुरू! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार इतकं व्याज, दिवाळीआधी गुंतवणुकीची संधी?

SCROLL FOR NEXT