पुणे

सांगवी पोलिसांचे चौकीत नाही चौकात चला अभियान

रमेश मोरे

जुनी सांगवी - सध्या पिंपरी चिंचवड शहराला नवीन पोलिस अधिकारी मिळाल्याने वरिष्ठांच्या शब्दाप्रमाणे 'चौकीत नाही चौकात चला'च्या सुचनेची अंमलबजावणी होताना सांगवी पोलिसांकडुन पहावयास मिळत आहे. शहराला वहातुकीची शिस्त लावण्याचे काम सध्या पोलिसांकडुन विविध ठिकाणी दिसुन येत आहे. 

दिवाळी तोंडावर आल्याने बाजारपेठेत विविध वस्तु खरेदीसाठी बाजारपेठा नागरीकांच्या गर्दीने फुलल्या आहेत. सण उत्सवाच्या काळात रस्त्यावरील होणारी गर्दी, चौकाचौकातुन वाहनांची गर्दी सध्या वाढत आहे. बेशिस्त वाहनचालक व जागा मिळेल तिथे दुचाकी, चारचाकी वाहने या दिवसात नागरीक उभी करतात. यात मिठाईची दुकाने, हॉटेल्स, सराफ बाजारपेठ ईलेक्ट्रीक दुकाने, भाजी मंडई या परिसरात नागरीकांची गर्दी असते. बेशिस्त पार्किंगमुळे अनेकदा वहातुककोंडीचा सामना खरेदीसाठी घराबाहेर पडणा-या नागरीकांना करावा लागतो. वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी आता जुनी सांगवीत रात्रीच्या वेळेला चौकाचौकातुन, बाजारपेठेत जुनी सांगवी पोलिसांचे पथक गस्त घालताना दिसुन येत आहे. यामुळे गर्दीचा फायदा घेवुन ईतर होणा-या अपराधांना ही चाप बसणार आहे. चौकाचौकातुन वाहन तपासणी, बेशिस्त पार्किंगवर पोलिस लक्ष ठेवुन आहेत. सण उत्सव काळात होणा-या चो-यांनाही यामुळे आळा बसण्यास मदत होणार आहे. 

जुनी सांगवीतील शितोळेनगर, पी.डब्लु.डी.मैदान कॉर्नर, गंगानगर महाराणा प्रताप चौक, भाजी मंडई परिसरातील वहातुक व्यवस्था व देखरख सांगवी पोलिसांकडुन करण्यात आली. यामुळे दिवाळी सणाचा आनंद निर्भयतेने घेताना नागरीक सध्या दिसत आहेत.

सण उत्सव काळातच पोलिसगस्त न ठेवता नियमित रोज अशा पद्धतीने लक्ष ठेवल्यास वहातुक शिस्तीबरोबरच गुन्हेगारी कृत्य कमी होतील.
- गणेश ढोरे-अध्यक्ष मधुबन मित्र मंडळ

पोलिसांचा हा उपक्रम स्तुत्य आहे.यामुळे बेशिस्त वाहन चालक व बेकायदा पार्किंगला आळा बसेल.
- संतोष कांबळे-नगरसेवक 

नागरीकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होवु नये. सण उत्सव काळात अनुचित प्रकार घडु नयेत यासाठी नागरीकांनीही पोलिसांना सहकार्य करावे.
- एस.एस.सुर्यवंशी पी.एस.आय. सांगवी पोलिस स्टेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi Babri Masjid : बाबरी मशीद पाडल्यावर सोनिया गांधींना कोसळलेले रडू; भाजप नेते म्हणाले- काँग्रेसच्या हृदयात आजही बाबर जिवंत

Mohammed Shami शिवाय भारतीय वेगवान गोलंदाजी अपूर्ण, तो न्यूझीलंड दौऱ्यात हवा होता, रवी शास्त्री स्पष्टच बोलले

ST Bus Service :दिवाळीसाठी वाशीम आगारातून बसफेऱ्यांत वाढ;प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून अतिरिक्त बससेवा

Latest Marathi News Live Update: अभिनेते रजनीकांत यांनी चेन्नईतील निवासस्थानाबाहेर चाहत्यांची घेतली भेट

IPL 2027 Trade: हार्दिक पांड्या ट्रेड होणार, पण कोणता खेळाडू मुंबई संघात येणार? MI आणि पंजाब किंग्समधील डील अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT