sangharsh yatra welcome at lal kurti madha taluka pune marathi news Sakal
पुणे

Sangharsh Yatra : आयटक च्या महासंघर्ष यात्रेचे माढा तालुक्याच्या वतीने लऊळ येथे जंगी स्वागत

राजर्षी शाहू जन्मभूमी ते बाबासाहेब दीक्षाभूमी पर्यंत महासंघर्ष यात्रा

वसंत कांबळे

कुर्डू -आयटक राज्यव्यापी महा संघर्ष यात्रेचे लऊळ येथे माढा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटना व हातपंप कर्मचारी संघटनेच्या वतीने जंगी स्वागत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

या संघर्ष यात्रेची सुरुवात कोल्हापूर येथून झाली असून २० नोव्हेंबर पासून मार्गक्रमण करीत आहे आज ३ डिसेंबर रोजी माढा तालुक्यात आगमन झाले त्या संघर्ष माढा तालुक्यातील ग्रामपंचायत व हातपंप कर्मचारी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.व स्नेह भोजनाचे नियोजन माढा तालुक्याच्या वतीने करण्यात आले.ही संघर्ष यात्रा १८डिसेंबर रोजी नागपूर येथे दीक्षाभूमी वर पोहचणार आहे.

कॉर्पोरेट दार्जिल्‍या धोरणामुळे श्रमिक वर्गसंकटात, सार्वजनिक उद्योगाची खाजगीकरण, कृषी क्षेत्रा समोरील प्रश्न गंभीर, भारतीय संविधानावरील वाढते हल्ले, अशा विविध मागण्यासाठी ही संघर्ष यात्रा नागपूर येथे जाणार आहे.

यावेळी राज्य सरचिटणीस श्याम काळे, राज्य सचिव राजू देसले, बबली रावत, पवार, सदाशिव निकम, राज्य कार्यकारणी सदस्य तानाजी ठोंबरे,

राज्य कौन्सिल सदस्य ए बी कुलकर्णी, तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना अध्यक्ष मुबारक मुलाणी, उपाध्यक्ष सुरेश कुंभार, सचिव सतीश गायकवाड, राजेश ढगे, हातपंप कर्मचारी संघटना अध्यक्ष परमेश्वर वादळे, समाधान गोसावी,

माजी तालुका सचिव बाळासाहेब चांदणे,समाधान चांदणे, बंडू चांदणे,व तालुक्यातील सर्व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संघटनेची ध्येयधोरणे याविषयी चर्चा करण्यात आली व पुढे बार्शीच्या दिशेने रवाना झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : e-KYC करताना OTP येत नसल्याची तक्रार, मंत्री आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती...

Latest Marathi News Live Update : 'दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवा अन्यथा...'; लष्करप्रमुख जनरल द्विवेदींचा पाकिस्तानला इशारा

आजचे राशिभविष्य - 04 ऑक्टोबर 2025

Easy Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा काहीतरी हटके! लिहून घ्या क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलडची सोपी रेसिपी

अग्रलेख : दहा तोंडी राजकारण..!

SCROLL FOR NEXT