पुणे

सांगली : जिल्ह्यात टँकरची संख्या ७४ वर

CD

सांगली जिल्ह्यात
टँकरची संख्या ७४ वर

६६ गावे, ४७९ वाड्यांवर पाणी ः एक लाख ४३ हजार लोकसंख्या बाधित

सकाळ वृत्तसेवा
सांगली ः जिल्ह्यातील दुष्काळाचाळी दाहकता वाढू लागली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ५६ टॅंकरने पाणीपुरवठा सुरु होता. नोव्हेंबरच्या मध्यावर १७ टॅंकरच्या संख्येत वाड झाली आहे. सद्यस्थितीला ७४ टँकरद्वारे ६६ गावे व ४७९ वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. १ लाख ४३ हजार ८८८ बाधित लोकसंख्येला आणि ९७ हजार ४३४ पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ३० खासगी विहिरी, कूपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सांगलीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणासाठी टँकर व विहीर अधिग्रहणाद्वारे प्रशासनाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ५६ टॅंकरने पाणीपुरवठा सुरु होता. पंधरा ते वीस दिवसात टॅंकरच्या संख्येत १८ ने वाढ झाली आहे. जिल्हा परिषदेच्या १७ नोव्हेंबरच्या अहवालानुसार सध्या ६६ खासगी व ८ शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.


कुठे काय स्थिती

जत तालुका ः
- टंचाईग्रस्त ५७ गावे व ४१४ वाड्या
- सुमारे १ लाख २४ हजार, ८६७ लोकसंख्येला
- ८१ हजार २२२ पशुधनाला
- ६४ टँकरद्वारे पाणीपुरवठा
- १८ खासगी विहिरी, कूपनलिकांचे अधिग्रहण
- ४ डिझेल इंजिन भाड्याने
----
कवठेमहांकाळ तालुका
- टंचाईग्रस्त १ गाव व ८ वाड्या
- १८३४ लोकसंख्येसाठी १ शासकीय टँकर
- नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीतील पाणीसाठा कमी
- २ खासगी विहिरींचे अधिग्रहण
----
तासगाव तालुका
- टंचाईग्रस्त १ गाव व ६ वाड्या
- ८५५ लोकसंख्येला १ खासगी टँकर
- तालुक्यात ३ खाजगी विहिरींचे अधिग्रहण
----
आटपाडी तालुका
- टंचाईग्रस्त ७ गावे व ५१ वाड्या
- १६ हजार ३३२ नागरिक बाधित
- १६ हजार २१२ पशुधनाला पाणी
- ८ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा
- तालुक्यात ४ विहिरी, कूपनलिकांचे अधिग्रहण
----
खानापूर तालुका
- २ गावे टंचाईग्रस्त
- ३ खासगी विहिरी, कूपनलिकांचे अधिग्रहण
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought List : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश; महसूल मंत्र्यांची घोषणा

'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्रीने सुरू केला नवा बिझनेस; श्वानाच्या नावाने सुरु केला फूड ट्रक, कुठे आहे हा ट्रक?

Marathi News Live Updates : TCS प्रकरणात इम्तियाज जलील यांना जामीन मंजूर; ५० हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाचा दिलासा

Gokul Dairy Loss ₹280 Crore Financial Burden : 'गोकुळ'च्या तोट्याची जबाबदारी कोणाची? जाब विचारण्याची गरज, सत्तेसाठी संघर्ष करणाऱ्या नेत्यांनी लक्ष घालण्याची अपेक्षा

Pune D-Mart: डी-मार्टमध्ये FDA ची मोठी कारवाई! ५० लाखांचे खाद्यतेल जप्त; ९ नमुन्यांचा अहवाल येणार

SCROLL FOR NEXT