सांगलीत खरीप पेरा ८८ टक्क्यांवर
मका, भुईमूग, तूर पिकांची सर्वाधिक पेरणी
ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली ः जिल्ह्यातील खरिपाचा पेरा अंतिम टप्प्याकडे आली आहे. या आठवड्यात पेरणीचा अंतिम अहवाल पूर्ण होईल, सद्यःस्थितीला २ लाख १८ हजार ०९१ हेक्टर म्हणजे ८८.६१ टक्क्यांवर पेरणी झाली आहे. मका, भुईमूग आणि तूर या पिकांची सर्वाधिक पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
जिल्ह्यातील खरिपाचे सरासरी पेरणी क्षेत्र २ लाख ४६ हजार ११८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी २ लाख १८ हजार ९१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या पावसामुळे पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढला असल्याने क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात तेलवर्गीय सूर्यफूल, सोयाबीन आणि भुईमूग या पिकांची पेरणी होते. यंदाच्या क्षेत्रात तेलवर्गीय पिकांची पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्याचे तुरीचे सरासरी क्षेत्र ९६६३ हेक्टर असून १० हजार २१७ हेक्टरवर पेरा झाला आहे. जत तालुक्यात सर्वाधिक तुरीची पेरणी झाली आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत चारा पीक म्हणून मका पिकाची पेरणी केली जाते. मक्याची ५६१२३ हेक्टरवर पेरा झाला आहे. मुगाची ५८ टक्के, उडीद ७२ टक्के पेरणी झाली आहे. दुष्काळी भागातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि खानापूर तालुक्यांत जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील खरिपातील पिकांची अपेक्षित वाढ झाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आडसाली हंगामातील उसाची लागवड २६ हजार ४६३ हेक्टरवर झाली आहे. वाळवा तालुक्यात सर्वाधिक ऊस लागवड झाली आहे.
तालुकानिहाय पेरणी क्षेत्र
तालुका... क्षेत्र (हेक्टरमध्ये)
आटपाडी...१०७३८.५०
जत...६३२२५.३०
कडेगाव...६३२२५.३०
कवठेमहांकाळ..१८५७२.७०
खानापूर...२०५५२.२५
मिरज..१८२०४.३०
पलूस...५६००
शिराळा...१७९६८.४०
तासगाव...२७८८८.६०
वाळवा...२१३००.४१
एकूण...२१८०९१.६०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.