सांगलीत १७०० ते ५००० रुपये
ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली ः येथील विष्णू्अण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात बुधवार (ता. २) कांद्याची २९८४ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रति क्विंटल १७०० ते ५००० तर सरासरी ३३५० रुपये असा दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
बाजार समितीच्या आवारात सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यातून कांद्याची आवक होते. मंगळवार (ता. १) कांद्याची ३४६३ क्विंटल आवक झाली होती. कांद्यास प्रति क्विंटल १७०० ते ४७०० तर सरासरी ३२०० रुपये असा दर मिळाला. सोमवार (ता. ३१) कांद्याची १५४५ क्विंटल कांद्याची आवक झाली असून त्यास प्रति क्विंटल १७०० ते ४७०० तर सरासरी ३२०० रुपये असा दर होता. शनिवार (ता. २९) कांद्याची ७७४४ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. कांद्यास प्रति क्विंटल १५०० ते ४३०० तर सरासरी २९०० रुपये असा दर मिळाला.
गुरुवार (ता. २७) कांद्याची ३००० क्विंटल कांद्याची आवक झाली असून त्यास प्रति क्विंटल १३०० ते ४४०० तर सरासरी २८५० रुपये असा दर होता. बुधवार (ता. २६) कांद्याची ४०११ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. कांद्यास प्रति क्विंटल १७०० ते ४६०० तर सरासरी ३१०० रुपये असा दर मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.