SGW26B09351
प्रभागात मुलभूत सुविधांसह दर्जेदार रस्ते बनविणार
सांगोला : माझा प्रभाग क्रमांक १ हा सर्वाधिक वाड्या-वस्त्यांचा आणि वेगाने विकसित होणारा भाग आहे. मस्के कॉलनी, नवीन वसाहत, ड्रीम सिटी, शिक्षक कॉलनी, गुळमिरे कॉलनी व चिंचोली रोड परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात हेच माझे ध्येय आहे. पाणीपुरवठा नियमित व उच्च दाबाने व्हावा यासाठी अपूर्ण योजना पूर्णत्वास नेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्व अंतर्गत रस्ते दर्जेदार सिमेंट-काँक्रीट व डांबरी स्वरूपात विकसित करून वाहतूक सुधारली जाईल. रोडलाईटची प्रभावी व्यवस्था करून सुरक्षित व उजळ परिसर निर्माण केला जाईल. हा परिसर वाड्या-वस्त्यांचा असल्यामुळे पहिल्या टप्प्यात भुयारी गटारी योजना अनेक भागात नाही. भुयारी गटार योजनेचा लाभ सर्व भागांना मिळावा तसेच सांडपाणी व्यवस्थेचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील. यासोबतच मध्यवर्ती ठिकाणी सुशोभित बगीचा उभारण्याचाही मानस आहे. नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छ, सुरक्षित आणि सर्व सुविधांनी युक्त प्रभाग घडविण्यास मी कटिबद्ध आहे.
राणी माने, नगरसेविका, सांगोला, नगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.