SGW26B09409
प्रभागातील विकासकामांना गती देण्यावर माझा भर
सांगोला : प्रभाग क्रमांक दहा हा शहराच्या मध्यवर्ती भागात असून वाढेगाव नाक्यापासून शहरात प्रवेश होत असल्याने या परिसराचा सर्वांगीण व सुबक विकास करणे हे माझे प्राधान्य असेल. प्रभागातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा, अखंड वीजपुरवठा तसेच इतर मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. भुयारी गटार योजनेमुळे खराब झालेल्या रस्त्यांचे मजबुतीकरण व काँक्रीटीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. मुख्य रस्ते तसेच अंतर्गत गल्ल्यांची दुरुस्ती प्राधान्याने पूर्ण केली जाईल. स्वच्छ व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय नियमित स्वच्छता मोहीम, कचरा संकलन व्यवस्थेची सुधारणा, सांडपाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी गटारींची साफसफाई, रस्त्यावरील दिव्यांची दुरुस्ती, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. महिलांच्या स्वयंसहाय्य गटांना प्रोत्साहन, युवकांसाठी क्रीडा साहित्य व ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाईल.
वैशाली झपके, नगरसेविका, सांगोला नगरपरिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.