पुणे

सांगोला शहरात अनधिकृत बॅनर, फ्लेक्स लावल्यास कारवाईचा बडगा

CD

सांगोल्यात अनधिकृत बॅनर लावल्यास कारवाईचा बडगा!
डिजिटल बॅनरसाठी ११ ठिकाणे निश्चित; प्रत्येक फलकावर क्यूआर कोड

सांगोला, ता. १८ : सांगोला शहरात अनधिकृत डिजिटल बॅनर, फ्लेक्स अन् जाहिरात फलक लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. डिजिटल बॅनर लावण्यापूर्वी नगरपरिषदेची परवानगी घेणे बंधनकारक असून, नियमांचे पालन करण्याच्या सूचना नगराध्यक्ष आनंदा माने अन् मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी डिजिटल बॅनर प्रिंटिंग व्यावसायिकांच्या बैठकीत दिल्या.

शहरातील डिजिटल बॅनर व फ्लेक्सबाबत उपाययोजना करण्यासाठी नगराध्यक्ष माने यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात बैठक झाली. सार्वजनिक ठिकाणी, चौकांत, रस्त्यांच्या कडेला तसेच शासकीय मालमत्तेवर परवानगीशिवाय बॅनर लावू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले. जनहित याचिका क्रमांक १५५/२०११ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्याधिकारी डॉ. गवळी यांनी दिल्या.

शहरात अधिकृत डिजिटल बॅनर लावण्यासाठी नगरपरिषदेने ११ ठिकाणे निश्चित केली आहेत. व्यावसायिकांनी व्यवसायाचा ना-हरकत दाखला घेणे आवश्यक आहे. प्रत्येक बॅनरवर नगरपरिषदेकडून दिलेला क्यूआर कोड छापणे बंधनकारक आहे. बॅनरचा आकार १० बाय १०, १० बाय १५ अन् १० बाय २० फूट इतकाच ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. बैठकीला प्रशासकीय अधिकारी सचिन पाडे, प्रभारी स्वच्छता निरीक्षक महेश रजपूत अन् डिजिटल बॅनर प्रिंटिंग व्यावसायिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Voting Percentage : गोकुळसाठी ९९.९६ % मतदान; सतेज पाटील, हसन मुश्रीफांची प्रतिष्ठा पणाला, उद्या मतमोजणी, कोण मारणार बाजी?, तालुका निहाय आकडेवारी

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

Tukaram Munde Viral Video : तुकाराम मुंढेंचा VIDEO व्हायरल; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीशी संबंध काय?

मुंबईत नोकरी मिळाली, जॉइनिंग करण्याआधीच आक्रीत घडलं, २३ वर्षीय तरुणीला नराधमाने संपवलं, पुलावरून ओढत नेत...; कुडाळमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT