पुणे

सांगोल्यात मटका जुगारावर पोलिसांची कारवाई; दोघांवर गुन्हे दाखल

CD

सांगोल्यात मटका जुगारावर पोलिसांची कारवाई
दोन ठिकाणी छापे; दोघांविरुद्ध गुन्हा, ४ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. ७ : सांगोला तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई करून दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या कारवाईत रोख रक्कम व मटका जुगाराचे साहित्य असा एकूण ४ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पहिली कारवाई शनिवारी (ता. ७) दुपारी १.१० च्या सुमारास महूद येथील गणपतराव देशमुख सभागृहाजवळ करण्यात आली. यावेळी जिशान पठाण (वय ३५, रा. महूद, ता. सांगोला) हा लोकांकडून अंदाजे येणाऱ्या आकड्यांवर पैसे स्वीकारून बेकायदेशीर कल्याण मटका जुगार खेळत असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्याच्याकडून ३ हजार ३०० रुपये रोख रक्कम, आकडे लिहिलेला कागद व पेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अतुल अरुण खराडे यांनी फिर्याद दिली असून, सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक लेंगरे करीत आहेत.
दुसरी कारवाई त्याच दिवशी दुपारी २.१० च्या सुमारास सांगोला येथील मच्छी मार्केट शेजारील पानटपरीजवळ करण्यात आली. यावेळी विशाल बाबासाहेब गावडे (वय २४, रा. आनंदनगर, सांगोला) हा लोकांकडून पैसे स्वीकारून मुंबई मटका जुगार खेळत असल्याचे आढळले. त्याच्याकडून १ हजार १७० रुपये रोख रक्कम, आकडे लिहिलेला कागद व पेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमर बळवंत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल येडगे तपास करीत आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्ह्यांची नोंद पोलिस हेडकॉन्स्टेबल भोसले यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT