MHD26B05099, MHD26B05100
सांगोला : येथील न्यायालयात उभारण्यात येणाऱ्या विधीज्ञ कक्ष या इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित मान्यवर.
गतिमान न्यायव्यवस्थेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे
न्यायमूर्ती निजामोद्दीन जमादार; सांगोल्यात विधी कक्षाचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
महूद, ता. ४ : भविष्यकालीन न्यायव्यवस्थेतील सुधारणा लक्षात घेऊन सांगोला येथील न्यायालय परिसरात विधीज्ञ कक्ष इमारत उभारण्यात येत आहे. ही नूतन इमारत न्यायालय, विधीज्ञ आणि पक्षकार यांच्यातील दुवा म्हणून कार्य करणार आहे. न्यायव्यवस्था अधिक जलद व गतिमान करण्यासाठी न्यायालयाशी संबंधित प्रत्येक घटकाने आपले योगदान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामोद्दीन जमादार यांनी केले.
सांगोला येथील दिवाणी न्यायालय परिसरात विधीज्ञांकरीता नव्याने उभारण्यात येणाऱ्या विधीज्ञ कक्ष या इमारतीच्या शनिवारी (ता. २८) भूमिपूजन समारंभात न्यायमूर्ती निजामोद्दीन जमादार बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला, जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश मनोज शर्मा, दिवाणी न्यायाधीश पी. आर. कुलकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश ए. ए. पाटील, एस. एस. साळुंखे, महाराष्ट्र आणि गोवा वकिल संघटनेचे सदस्य मिलिंद थोबडे, सांगोला विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड. मारुती ढाळे उपस्थित होते.
ॲड. मारूती ढाळे यांनी सांगोला न्यायालयातील सद्यःस्थितीचे कामकाज तसेच सांगोला तालुक्याकरीता गतिमान न्यायव्यवस्था याकरिता आणखी न्यायालयांची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी ॲड. मिलींद थोबडे यांनीही विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन न्यायाधीश ए. ए. पाटील व विधीज्ञ संघाचे सदस्य ॲड. गजानन भाकरे यांनी केले. ॲड. उदय घोंगडे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.