लोगो : सांगोला नगरपरिषद
---
SGW26B09385
नाना-नानी पार्क उभारण्यासाठी प्रयत्न करणार
सांगोला : माझा प्रभाग हा केवळ विकासाचा आराखडा नसून तो नागरिकांच्या अपेक्षांचा आणि विश्वासाचा मानबिंदू आहे. शहरातील तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या महिलांसाठी विविध ठिकाणी अद्ययावत व स्वच्छ प्रसाधनगृहांची उभारणी करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. महिलांच्या सुरक्षितता व सोयीसुविधांना प्राधान्य देणे हे आपल्या व्हीजनचे पहिले पाऊल असणार आहे. प्रभागातील लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व सुविधांनी युक्त बगीचा तसेच ‘नाना-नानी पार्क’ उभारण्यासाठी प्रयत्न करणार. सर्व्हे नंबर १८० मधील उद्यान बालकांना खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्याबरोबरच त्या परिसरातील सांडपाण्याच्या व्यवस्थेचा प्रश्न मार्गी लावेन. खंदक भागात नव्याने विकसित होणाऱ्या व्यापारी संकुलास ‘श्री चौंडेश्वरी व्यापारी संकुल’ असे नामकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच देवांग कोष्टी समाजाचे आद्यपुरुष श्री संत राणोजी बुवा यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार व परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी विशेष लक्ष देणार आहे. प्रभागातील बेघर नागरिकांना शासनाच्या विविध योजनांद्वारे हक्काची घरे मिळावीत यासाठी सातत्याने पाठपुरावा करेन. नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेमुळे उखडलेले रस्ते पुन्हा दर्जेदार करण्यासाठी प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा करणार आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि सर्वसमावेशक प्रभाग उभारणे हेच माझे व्हीजन आहे. नागरिकांच्या सहभागातून आणि प्रशासनाच्या सहकार्याने आपण हा विकासाचा संकल्प पूर्ण करू.
- दिव्यानी दौंडे, नगरसेविका, सांगोला नगरपरिषद
---
SGW26B09375
स्वच्छ, सुरक्षित, सुविधायुक्त प्रभागाचा संकल्प
सांगोला : माझ्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये भीमनगर, साळुंखे वस्ती, बुंजकर वस्ती, पाटील वस्ती, जांगळे वस्ती तसेच इतर लहान- मोठ्या वस्त्यांचा समावेश होतो. या सर्व भागांचा समतोल आणि सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय आहे. प्रत्येक वस्तीत मूलभूत सुविधा समान प्रमाणात पोचल्या पाहिजेत, यासाठी मी कटिबद्ध आहे. प्रभागातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, नियमित स्वच्छता, सांडपाण्याचा योग्य निचरा आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील. या प्रभागात जास्त वाड्या- वस्त्यांचा समावेश असल्यामुळे तेथे नियमित व योग्य दाबाने पाणीपुरवठा होईल हे सांगता येत नाही; त्यासाठी नियमित पाणीपुरवठा कसा होईल यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. शहरापासून वस्त्यांपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांवर विजेचे खांब उभारून प्रकाश व्यवस्था सुधारण्यावरही भर दिला जाईल. भीमनगर तसेच इतर वाड्यांमध्ये स्वच्छता, ड्रेनेज आणि कचरा व्यवस्थापन या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल. नियमित कचरा संकलन, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट आणि डास प्रतिबंधक उपाययोजना राबवून परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्याचा माझा संकल्प आहे. नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त असा आदर्श प्रभाग उभारण्याचा माझा संकल्प आहे.
- गोदाबाई बनसोडे, नगरसेविका, सांगोला नगरपरिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.