SGW26B09197
अकलूज : सांगोला तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व इतर.
सांगोला तालुक्यातील अनेकांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश
सांगोला, ता. २३ : सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठे बळ मिळाले आहे. अकलूज येथे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी दीपक आबा साळुंखे-पाटील गटाचे अनिल मोटे, चोपडी ग्रामपंचायत सदस्य अनिल जगदाळे, पाचेगाव येथील उल्हास बिले, शहाजी पाटील गटाचे शिवसेना सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष सदानंद पांढरे, जुनोनी ग्रामपंचायत सदस्य आबा पाटील, बलवडीचे माजी उपसरपंच विकास मोहिते, घेरडीचे श्रीनिवास करे, भाजपचे उत्तम खांडेकर तसेच डॉ. परेश खंडागळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष दत्तात्रय सावंत, महेश नलवडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशामुळे सांगोला तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.