पुणे

शेकापची सत्ता अबाधित राहणार की साळुंखे-पाटील वेगळी भूमिका घेणार? याकडेच लागले लक्ष

CD

लोगो : सांगोला पंचायत समिती
---
SGW26B09442
डॉ. बाबासाहेब देशमुख
---
SGW26B09441
शहाजीबापू पाटील
---
SGW26B09443
दीपक साळुंखे-पाटील,
---
PNE26W02467
चेतनसिंह केदार-सावंत
---
शेकापची सत्ता की साळुंखे-पाटील गट ‘किंगमेकर’?
सभापतिपदासाठी काशीद आघाडीवर तर इंगवले अन्‌ पाटील यांच्या नावांचीही चर्चा
दत्तात्रय खंडागळे : सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. १० : सांगोला पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीकडे तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि दीपकआबा साळुंखे-पाटील गटाने मिळून नऊ जागांवर विजय मिळवत स्पष्ट वर्चस्व सिद्ध केले आहे, तर महायुतीला पाच जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ कायम असलेली शेकापची सत्ता यावेळीही टिकणार की साळुंखे-पाटील वेगळा राजकीय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
या निवडणुकीत शेकापने साळुंखे-पाटील गटासोबत आघाडी करत निवडणूक लढवली होती. दुसरीकडे, शिवसेना व भाजपने युती करून आघाडीविरुद्ध मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. पंचायत समितीच्या १४ जागांपैकी शेकापने सहा, तर साळुंखे-पाटील गटाने तीन जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे या दोघांचे मिळून पंचायत समितीवर स्पष्ट बहुमत झाले आहे. शिवसेनेला चार तर भाजपला एक जागा मिळाल्याने महायुतीचे पाच सदस्य निवडून आले आहेत.
निवडणुकीनंतरही शेकाप- साळुंखे पाटील आघाडी कायम राहिली तर सभापतिपद शेकापकडे जाण्याची शक्यता व्यक्त होत असून, सोनंद गणातील काजल काशीद यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. मात्र दीपकआबा साळुंखे- पाटील यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत काही वेगळा निर्णय झाल्यास साळुंखे-पाटील गटाच्या पूनम इंगवले यांचे नाव पुढे येऊ शकते. दुसरीकडे, शिवसेनेकडून माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या बंधूंच्या सूनबाई आणि कडलास गणातून विजयी झालेल्या राणी पाटील यांच्यासाठीही महायुतीकडून सभापतिपदासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
---
चौकट
साळुंखे-पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष
पंचायत समिती सभापती निवडीमध्ये दीपकआबा साळुंखे-पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. सध्या ते कोणत्याही पक्षात नसल्यामुळे त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या गटाचे तीन सदस्य असल्याने ते ज्या बाजूने उभे राहतील, त्या पक्षाचा सभापती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---
चौकट
बैठका मुंबईत, चर्चा सांगोल्यात
सभापती-उपसभापती निवडीपेक्षा सध्या नेत्यांच्या मुंबईतील बैठकींची चर्चा तालुक्यात रंगली आहे. दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत मुंबईत हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. राज्याचे अधिवेशन सुरू असल्याने सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हेही मुंबईत असून, विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी बैठका होत असल्याच्या चर्चांमुळे तालुक्यातील राजकारण अधिकच तापले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Meeting Decision Gokul Dudh: ‘गोकुळ’दूध संघावर प्रशासक, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय, प्रशासक म्हणून यांची होणार नियुक्ती

Pune News: रस्त्यावर माणुसकीचाही श्वास कोंडला; आळंदीत वाहतूक कोंडीने माजी सीआरपीएफ जवानाचा मृत्यू, प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा बळी!

Akola News: आरटीई पडताळणी समितीच संशयाच्या भोवऱ्यात!; माहिती २० सदस्यांच्या समितीतून लीक होत असल्‍याचा आरोप?

Akola News: अकोला जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य धोक्यात;कृषी विद्यापिठाच्या तज्ज्ञांचे संशोधन, शेतकऱ्यांनी जागृत होण्याची गरज

Nitin Gadkari: पेट्रोल-डिझेलवरील वाहनांना भवितव्य नाही: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, स्वच्छ इंधनाकडे वळण्याचा सल्ला..

SCROLL FOR NEXT