पुणे

सांगोला शहरात टिपरच्या धडकेत व्यापाऱ्याचा मृत्यू

CD

टिप्परच्या धडकेत व्यापाऱ्याचा मृत्यू

सांगोला, ता. २४ : टिप्पर मागे घेत असताना चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने टिप्परच्या धडकेत व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात शहरातील त्रिमूर्ती टॉकीजसमोर रविवारी (ता. २२) सकाळी सुमारे सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिप्पर (क्रमांक - एम.एच -४५-ए.एक्स ६२२९) हा वाहनचालक कोणताही इशारा न देता वाहन मागे घेत असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष झाले. यावेळी त्रिमूर्ती टॉकीजसमोर उभे असलेले राजेंद्र विजयकुमार देशपांडे (वय ५५, रा. कोष्टी गल्ली, सांगोला) यांना जोराची धडक बसली. या अपघातात त्यांच्या पोट व पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गोपाल विजयकुमार देशपांडे (वय ५२ एक, व्यवसाय-व्यापार, रा. कोष्टी गल्ली, सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे. या अपघात प्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शहराच्या मुख्य परिसरामध्ये सुरू असलेल्या कामाजवळ हा अपघात घडल्यामुळे शहरातील नागरिकांतून विशेषता व्यापारी वर्गातून तीव्र भावना व्यक्त होत आहे. घटनेचा तपास सांगोल्याचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल वाघमोडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

Kukadi Project : कुकडी प्रकल्पातून उन्हाळी पहिल्या आवर्तनात 7.6 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT