पुणे

सांगोला विद्यामंदिर प्रशालेचा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात ; संस्थेचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण

CD

MHD26B05095
सांगोला : सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या वर्धापन दिनानिमित्त बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मान्यवर.
............
सांगोला विद्यामंदिर प्रशालेचा
७४ वा वर्धापन दिन उत्साहात
.......
महूद, ता. ३ : शिक्षणमहर्षी गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी स्थापन केलेल्या सांगोला विद्यामंदिर प्रशालेने देदीप्यमान प्रवासाची ७४ वर्षे पूर्ण करत अमृत महोत्सवी वर्षात दिमाखात पदार्पण केले आहे. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून या प्रशालेच्या पहिल्या बॅचचे ज्येष्ठ विद्यार्थी गोविंद गवळी व तुकाराम गुळमिरे यांचे हस्ते ध्वजवंदन व संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष ॲड. विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, संस्था सदस्य चंद्रशेखर अंकलगी, दिगंबर जगताप, प्रफुल्लचंद्र झपके, मंगलप्रभा कोरी यांच्यासह विद्यामंदिर परिवारातील सेवानिवृत्त कर्मचारी, सांगोला, नाझरा, कोळा विद्यामंदिराचे प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. धनाजी चव्हाण यांनी केले तर उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे यांनी आभार मानले.

Nashik Accident : काळाचा घाला! उमराणे उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात; सिडकोतील एकाच कुटुंबातील तिघांचा अंत

Kalamb News : इस्त्रायल-इराण युद्धाचा धसका, पेट्रोल दरवाढीची अफवा; कळंबमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील भोर - महाड मार्गावर भीषण अपघात

Kolhapur Market: बंद गाळे बनले कचरा कोंडाळा; अवैध धंद्यांचे ठिकाण, मोठी संपत्ती असतानाही उत्पन्न वाढीसाठी वापर नाहीच

Nashik Bribery Case : जीएसटी चौकशीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी मागितली 'कोटी'ची लाच; दोन वरिष्ठ अधिकारी जाळ्यात

SCROLL FOR NEXT