4sanitary_dispose_20123.jpg 
पुणे

सॅनिटरी नॅपकिन मोफत वाटणार 

ज्ञानेश सांवत

पुणे : बहुचर्चित पॅडमॅन चित्रपट पाहिल्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन पुरविण्याची योजना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मांडली. त्यानुसार पक्षातर्फे महिन्याकाठी पाच हजार नॅपकिन वाटण्याच्या योजनेचा "श्री गणेशा' गणेशोत्सवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच प्रभागांतील झोपडपट्यांमधील गरजू महिलांना त्यात सामावून घेण्याचे नियोजन आहे. 

सॅनटरी नॅपकिनबाबत जनजागृती करणारा अभिनेता अक्षयकुमारचा पॅडमॅन चित्रपट प्रदर्शित होताच, महापौर मुक्ता टिळक यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि पक्षाच्या नगरसेवकांनी तो पाहिला. त्यापासून प्रेरणा घेत, मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटण्याची योजना राबविण्याचा निर्णय गोगावले यांनी जाहीर केला होता. महिला व बालकल्याण समितीच्या माजी अध्यक्षा राणी भोसले यांनी तशी सूचना मांडली आणि तिची अंमलबजावणी सुरू केली, तिची व्याप्ती वाढविण्याच्या उद्देशाने गोगावले यांनी पुढाकार घेत, ज्या महिलांना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करणे शक्‍य नाही, अशा महिलांना नॅपकिन देण्यात येणार आहे.
 
गोगावले म्हणाले, "नवभारत निर्मिती संकल्प सिद्धीच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य, त्याबाबतच्या तपासण्या, निदान करण्यात येईल. शहरातील दहा वस्त्यांमध्ये हा उपक्रम असेल. त्यातून अडीचशे महिलांना नॅपकिन दिले जातील. त्यासाठी पाच प्रभागांची निवड केली आहे. या योजनेचा खर्च पक्ष करणार असून, त्यासाठी काही लोकांनीही मदतीसाठी हात पुढे केला आहे. महिलांना हेल्थकार्ड दिले जाणार आहे.'' 
योजनेच्या प्रमुख राणी भोसले म्हणाल्या, "योजनेत पाच प्रभागांचा समावेश असला तरी ज्या महिलांना गरज आहे, त्यांना ते दिले जाईल. योजनेची व्याप्ती वाढविताना, नॅपकिनच्या विल्हेवाटीची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. नॅपकिनच्या वापराबाबत जागृती निर्माण करण्यात येईल. त्या त्या प्रभागातील नगरसेविकांच्या कार्यालयात नॅपकिन उपलब्ध असतील.''
 
या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन, महिलांचा फायदा व्हावा यासाठी महापालिकेच्या वतीने आवश्‍यक ते सहकार्य करू, असे महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राजश्री नवले यांनी स्पष्ट केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Pollution : तंबाखूपेक्षा जास्त मृत्यू वायू प्रदुषणामुळे! भारता रोज ५७०० लोक गमावायेत जीव, धक्कादायक अहवाल समोर...

Jalna News : अंबड-घनसावंगी तालुक्यातील 252 गावासाठी 139 पोलिस पाटील पदासाठी पात्र; 26 गावाना मिळाल्या पोलिस पाटील

दिवाळीत गोड खाण्यावर ठेवा नियंत्रण! शरिरावरील दुष्‍परिणाम टाळण्यासाठी आहारतज्‍ज्ञांचा सल्‍ला

Black Magic Incident : मंचर स्मशानभूमीत जादूटोण्याचा संशय; अंधश्रद्धेचे काळे सावट कायम

Nicolas Sarkozy: फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझींना ५ वर्षांची शिक्षा, नेमकं प्रकरण काय? वाचा...

SCROLL FOR NEXT