पान १६
----------
खासदार संजय देशमुखांना
शिवसेनेची घरपोच नोटीस
सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर ३१ ऑगस्टला सुनावणी
ॲग्रोवन वृत्तसेवा
दिग्रस, जि. यवतमाळ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाहेर पडून शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांच्या बंडखोरी व विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाची नोटीस उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. १७) यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख यांच्या चिंचोली येथील निवासस्थानी जाऊन सुपूर्द केली.
खासदार अरविंद सावंत यांनी सहा खासदारांच्या बंडखोरी, तसेच दुसऱ्या पक्षात विलिनीकरणाच्या मुद्द्याला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ ऑगस्टला होणार आहे. न्यायालयाची नोटीस मिळाली नसल्याचे कारण पुढे येऊ नये, यासाठी उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट खासदार देशमुख यांच्या घरी जाऊन नोटीस दिली. खासदारांच्या निवासस्थानी उपस्थित असलेले चैतन्य ढोरे यांनी नोटीस स्वीकारून पोचपावती दिली. या वेळी खासदार सावंत यांचे स्वीय सहायक दीपक गोगल, जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, किशोर इंगळे, उपजिल्हाप्रमुख अॅड. वीरेंद्र राजे, राहुल देशपांडे, पूनम पटेल, अजिंक्य मात्रे उपस्थित होते.
या प्रकारामुळे दिग्रस परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले असून, ३१ ऑगस्टच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
उबाठाच्या सहा खासदारांचे नेतृत्व करणारे खासदार देशमुख यांना बंडखोरी व दुसऱ्या पक्षात विलीनीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाची नोटीस मिळाली आहे. ती नोटीस न मिळाल्याचे कारण आता नको, म्हणून आम्ही त्यांच्या घरी जाऊन दिली. त्यामुळे देशमुख यांना ३१ ऑगस्टच्या सुनावणीला न्यायालयात हजर राहावे लागेल, असे जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.