पुणे

नागठाणे साहित्य संमेलन स्टोरी

CD

साहित्य संमेलनात व्यसनमुक्तीचा जागर

संजय झट्टू यांच्याकडून सामाजिक प्रबोधन; दोन दशकांपासून कार्य

सुनील शेडगे ः सकाळ वृत्तसेवा

छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी, ता. २ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वाचक, साहित्यप्रेमींसह विविध सामाजिक स्तरातील लोकांची गर्दी ओसंडून वाहत आहे. त्यात काही चेहरे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. छत्रपती संभाजीनगरहून आलेले संजय झट्टू हे त्यापैकीच एक. त्यांचा व्यसनमुक्तीचा जागर या गर्दीत लक्षणीय ठरत आहे.
श्री. झट्टू हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील कंधारचे. सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असतात. वयाची साठी गाठलेले झट्टू हे गेली दोन दशके व्यसनमुक्तीचे कार्य प्रभावीपणे करतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून ते नेहमी संमेलनस्थळी भेट देतात.
त्याच पार्श्वभूमीवर ते साताऱ्यात दाखल झाले आहेत. संमेलनस्थळी मोठी गर्दी असूनही श्री. झट्टू यांचा पेहराव सर्वांसाठी लक्षवेधक ठरत आहे. त्यात पाठीवर अन् पोटावर लावलेली त्यांची पोस्टर्स नजरेत भरतात. या पोस्टर्सवर त्यांनी व्यसनमुक्तीचे संदेश लिहिले आहेत. आजवरच्या जवळपास १५ मराठी साहित्य संमेलनास ते उपस्थित राहिलेले आहेत. त्यात सासवड, उदगीर, वर्धा, नाशिक, अमळनेर आदी स्थळांचा समावेश आहे. इतकेच नव्हे, तर दिल्लीत आयोजिलेल्या साहित्य संमेलनालाही त्यांनी हजेरी लावली होती. याकामी त्यांचे सहकारी जगन्नाथ सुपेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे ते सांगतात.

कोट

व्यसनमुक्ती जागरास साताऱ्यातील संमेलनस्थळी चांगला प्रतिसाद लाभत आहे. अनेक लोक आदराने, अगत्याने विचारपूस करतात. कार्याचे कौतुक करतात.

संजय झट्टू

छायाचित्र ओळी
NGT26B08014
व्यसनमुक्तीविषयी प्रबोधन करणारे संजय झट्टू.
NGT26B08014

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSRP Deadline Rule: आता दंड की सवलत? अंतिम मुदतीनंतरही HSRP नंबर प्लेट बदलली नसेल तर काय होणार? जाणून घ्या नियम...

Ikkis Movie Review: भारतमातेच्या वीरपुत्राची शौर्यगाथा; कसा आहे धर्मेंद्र' यांचा शेवटचा चित्रपट 'इक्कीस'

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात विकासाची पवनचक्की फिरतेय; पण शेतकरी व बेरोजगारांचे प्रश्न अनुत्तरितच!

Oppo Reno 15 Series Launch Date : तब्बल 200 मेगापिक्सेल कॅमेरा असणाऱ्या ‘Oppo Reno 15’ सीरीजची भारतातील ‘लाँच डेट’ जाहीर!

Latest Marathi News Live Update: रिपब्लिकन पक्षाकडे मतांचा साठा असतानाही महायुतीकडून सत्तेचा वाटा मिळत नसल्याची नाराजी

SCROLL FOR NEXT