पुणे

हनुमान चालिसा म्हणून नोकऱ्या मिळणार आहेत का? संजय काकडेंचा सवाल

राज ठाकरेंनी सत्ताधारी पक्षाने आजपर्यंत विकासासाठी काय केलं आहे या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे काढण्याच्या भूमिकेला भाजपच्या अनेक नेत्यांनी समर्थन केले आहे. मात्र, भाजपचे नेते संजय काकडे यांनी राज ठाकरे ठाकरे यांच्या भूमिकेवर काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी भोंगे आणि इतर गोष्टींवर बोलण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर बोलावे असा सल्ला दिला आहे. राज ठाकरेंनी राज्यातल्या सत्ताधारी पक्षाने आज पर्यंत राज्याच्या विकासासाठी काय केलं आहे या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे असेदेखील काकडे यांनी यावेळी सांगितले. तसेच हनुमान चालिसा म्हणून काहीही होणार नाही अशी बोचरी टीका केली आहे.

राज ठाकरे यांच्या हस्ते आज पुण्यातील खालकर चौकातील मारुती मंदिरात महाआरती आणि सामूहिक हनुमान चालिसाचे पठन होणार आहे. मात्र, आरती आणि हनुमान चालिसा वाचून कार्यकर्ते आणि जनतेचा वेळ वाया घालवणे योग्य नसल्याचे काकडे म्हणाले. अशा कार्यक्रमांमुळे पोलीस आणि सामन्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. यावेळी त्यांनी हनुमान चालिसा वाचून किंवा भोंगे काढून नोकऱ्या मिळणार आहेत का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी विकासावर बोलावे असा सल्लादेखील त्यांनी यावेळी बोलताना दिला आहे. भाजपने राज ठाकरेंशी म्हणजेच मनसेशी युती करून भाजपचा फायदा होणार नसल्याचेही म्हटले आहे. राज्यात विकासाच्या प्रश्नावर कोणताच पक्ष बोलत नसल्याची खंतदेखील यावेळी त्यांनी व्यक्त केली.

कोल्हापुरात भाजपचा पराभव नक्की होता

कोल्हापूप उत्तरमध्ये पार पडलेल्या पोट निवडणुकीत महाविकास आगाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना मोठा विजय मिळाला आहे. याबाबत काकडे यांनी प्रश्न विचारला असता काकडे म्हणाले की, कोल्हापुरात भाजपचा पराभव होणार हे नक्की होतं असे काकडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT