Sanjay Kakade slams Pankaja Munde in Pune 
पुणे

पंकजा, आता महाराष्ट्रभर फिरून काय दिवे लावणार?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भाजपच्या माजी आमदार पंकजा मुंडे यांनी काल (12 डिसेंबर) भगवानगडावर केलेल्या भाषणात महाराष्ट्रभर फिरणार असल्याचे, उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या या निर्णयावर खासदार संजय काकडे यांनी जोरदार टीका केली आहे. 

''पंकजा मुंडे यांनी काल जे वक्तव्य केलं ते भाजपच्या सच्चा कार्यकर्त्याला दुखावणारे आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं, ते कृतीत आणलं नाही. पाच वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्हाला काही कामं करता आली नाही तर महाराष्ट्रात फिरुन तुम्ही काय दिवे लावणार?'' असा सवाल संजय काकडे यांनी केला आहे. 

ते म्हणाले, ''ज्याला आपला मतदारसंघ सांभाळता येत नाही, त्यांनी 'मी पक्ष वाढवेल, मी हे करेल, मी ते करेल असे बोलू नये.  गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे मी राज्यसभेवर निवडून आलो. ते पाच वर्षे सगळ्यांना सांभाळायचे. पंकजा मुंडे यांनी मतदारसंघात इतर समाजातील लोकांना त्रास दिला. जातीपातीचे राजकारण केल्याने पंकजा यांचा पराभव झाला. आता मात्र, स्वतःचा पराभव दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न त्या करत आहे. पक्षावर दबाब टाकून स्वतःच्या पदरात काही तरी मिळवण्याची पंकजा यांची नेहमीची सवय आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR नोंदणीच्या कामासाठी शिक्षक अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ; ERO, AERO ना मोठा दिलासा

Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर अपघात, फॉर्च्युनरचा चक्काचूर, एकाचा मृत्यू; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर

Marathi News Live Updates : उद्यापासून दोन दिवस नाशिकला ‘येलो अलर्ट’

Tax Amendment Bill 2026: UPI, NEFT आणि RTGS सह डिजिटल पेमेंट्समध्ये काय बदल होणार? पाहा 10 मोठे अपडेट्स एका क्लिकमध्ये

IND vs SL Warm UP Match: केएल राहुल करतोय टीम इंडियाचे नेतृत्व, मग शुभमन गिलला नेमकं काय झालं? BCCI ने दिली माहिती

SCROLL FOR NEXT