पुणे

बारामती दूध संघाच्या अध्यक्षांचा राजीनामा मंजूर

CD

माळेगाव, ता. १५ : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष संजय रामचंद्र कोकरे यांचा राजीनामा शुक्रवारी (ता. १५) संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर झाला.
बारामती तालुका दूध संघाचे सर्वेसर्वा दिवंगत लोकनेते अजित पवार यांनी १७ जानेवारी २०२५ पासून कोकरे यांना अध्यक्षपदाची, तर उपाध्यक्षपदाची दत्तात्रेय सदाशिव वावगे यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती. संबंधित पदाधिकाऱ्यांचा ठरवून दिलेला एक वर्षाचा कालावधी पूर्णत्वाला येऊनही राजीनामा होत नव्हता. परिणामी संचालक मंडळात काहीशी नाराजी पसरली होती. इतर संचालकांनाही अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळावी, असे म्हणणे काही संचालकांनी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार मावळते अध्यक्ष कोकरे यांनी आपला राजीनामा व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश वामन राणे यांच्याकडे याअगोदर दिला होता. दरम्यान, कोकरे यांच्या कार्यकाळात बारामती दूध संघ प्रशासनाने दूध व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करताना दर्जा अधिक चांगला राहण्याची काळजी घेतली. तसेच कारभारात आर्थिक पारदर्शकता आणण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"माझी फसवणूक झाली...", Prithvi Shaw च्या होणाऱ्या बायकोची 'ती' पोस्ट व्हायरल अन् ब्रेकअफच्या चर्चांना उधाण

Pune Rain News: पुण्यात मुसळधार पावसाचा तडाखा! कात्रजमध्ये सोसायटीची सीमाभिंत कोसळली; १८ वाहनांचे मोठे नुकसान

Marathi Live Updates : 12 तासांनंतर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू

Pune Rain Red Alert: पुण्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची रिपरिप; घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ‘रेड’ अलर्ट

Pandharpur Air Ambulance: आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी प्रथमच एअर ॲम्बुलन्स; पंढरपूरहून पुणे-मुंबईत तातडीने हलविण्याची सुविधा

SCROLL FOR NEXT