Sanjay More along with some Shiv Sainiks present police station sakal
पुणे

शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह काही शिवसैनिक पोलिसांत हजर

किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेच्या आवारात झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी गुन्हा दाखल असलेले शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह शिवसेनेचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते आज सकाळी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत.

या प्रकरणात मोरे, पदाधिकारी चंदन साळुंके, किरण साळी, सूरज लोखंडे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनी गवते यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रशांत लाटे यांनी या संदर्भात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात सोमवारी सनी गवते (वय ३२, रा. नाना पेठ) याला अटक करण्यात आली आहे. धक्काबुक्की झाल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील तक्रार केली आहे. गुन्हा दाखल झालेल्या अन्य शिवसैनिकांचा पोलिस शोध घेत होते. त्यामुळे शहर प्रमुखांसह अनेक शिवसैनिक स्वतःहून पोलिसांत हजर झाले आहेत. या सर्वांवर काय कारवाई होणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

Simple Footpath Wedding: अमरावतीत उड्डाणपुलाखाली फुटपाथवर रंगला साधेपणाचा अनोखा विवाहसोहळा; सोशल मीडियावर कौतुकाची लाट

Successful National Lok Adalat: गंगापूर जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी; १०७ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा, ८० लाख रुपयांची वसुली

SCROLL FOR NEXT