Sanjay More demand to Transfer Pune Police Commissioner in Kalyaninagar accident case Sakal
पुणे

Pune Porsche Accident : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील पुणे पोलिस आयुक्तांची बदली करा; संजय मोरे

. केंद्रातील एक मोठा नेता गरीब आणि श्रीमंतांमध्ये दरी तयार करत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला तत्परतेने मिळालेला जामीन आणि संशयास्पद वर्तणुकीमुळे पुणे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखली जावी. यासाठी तातडीने पुणे पोलिस आयुक्तांची बदली करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शुक्रवारी करण्यात आली.

पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी म्हटले आहे, की अपघातानंतर स्थानिक आमदाराच्या हस्तक्षेपामुळे अल्पवयीन आरोपीच्या रक्त चाचणीला काही काळ उशीर झाला. याशिवाय राज्यपातळीवरील अनेक नेत्यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचे काम केले आहे. केंद्रातील एक मोठा नेता गरीब आणि श्रीमंतांमध्ये दरी तयार करत आहे.

त्यात श्रीमंतांनी गरिबांना गाडीने उडविले; तरी त्यांना गुन्ह्यातून सवलत, अशी पद्धत विकसित करण्याचे काम केले आहे. त्यामुळे शहराची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर, अशी ओळख पुसून चुकीची संस्कृती विकसित करण्याचे काम होणार असेल; तर आम्ही ते सहन करणार नाही.

आता पबचालक व मालकांनी प्रशासन व सरकार विरोधात आंदोलन करण्यासाठी मुलांचा वापर केला. याबाबत पबमालकांना कडक शासन झालेच पाहिजे. अन्यथा त्यांना पोलिसांची साथ असल्यावर शिक्कामोर्तब होईल, म्हणूनच पोलिस आयुक्तांची बदली क्रमप्राप्त ठरते, असे मोरे यांनी नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT