पुणे

संजय राऊत म्हणाले, रात्री १२ वाजता आमित शहांना फोन केला होता अन्...

सकाळ डिजिटल टीम

पुणे : माझी नसलेली संपती ईडीने (ED) जप्त केली. माझ्या वडिलोपार्जित घरावर कारवाई केली. माझ्या निकटवर्तीय लोकांवर कारवाई केली. तेव्हा मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना रात्री १२ वाजता फोन केला होता. त्यांना म्हटले, मी दिल्लीत बसलो आहे. मला अटक करा. माझ्या निकटवर्तीयांना त्रास देऊ नका, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

पुणे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नेहमी तुमच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यावरच धाडी पडतात. भाजपच्या नेत्यांवर धाडी पडत नाही. याचा तुम्हाला त्रास होत नाही का, असा प्रश्न सूत्र संचालकाने संजय राऊत यांना विचारला. ‘त्रास म्हटलं तर होतो. परंतु, करून घ्यायला नको. याचं आम्ही २०२४ नंतर उत्तर देऊ. सगळ्यांचे दिवस येतात. आमचे पण दिवस येईल’, असे प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

हे लोक रोज म्हणतात संजय राऊत यांना अटक करू. मी बसलो आहे, कधी अटक करणार, असा प्रश्न संजय राऊत यांनी केला. निकटवर्तीयांवर कारवाई केल्यानंतर गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना फोन करून मला अटक करा, माझ्या निकटवर्तीयांना त्रास देऊ नका, असे स्पष्ट शब्दात सांगितले होते, मी दिल्लीतच आहो, असेही त्यांना सांगितले होते, असे राऊतांनी (Sanjay Raut) सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT