पुणे

नवसह्याद्रीच्या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे

CD

नसरापूर, ता. १६ : नवसह्याद्री शिक्षण संस्थेच्या मॅनेजमेंट विभागाच्या वतीने नवीन विद्यार्थ्यांसाठी ‘संकल्प २०२६’ या तीन दिवसीय इंडक्शन प्रोग्रॅमचे आयोजन केले होते. १० ते १२ सप्टेंबर दरम्यान झालेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे देण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरणाची ओळख करून देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये प्रेरणादायी व्याख्याने, करिअर मार्गदर्शन, मनःशक्ती कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रकल्प स्पर्धा आणि मिस्टर अँड मिस फ्रेशर अशा स्पर्धांचा समावेश होता.
या वेळी प्रा. मनोज वाबळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी बीओेएस सदस्य डॉ. तनुजा देवी यांनी आर्थिक साक्षरता, तर डॉ. जगदीश राठोड यांनी एकाग्रतेवर भाष्य केले. व्याख्याते डॉ. राजेंद्रसिंग परदेशी यांनी ध्येय निश्चितीवर मार्गदर्शन केले. आविष्कार रिसर्च कमिटीचे अध्यक्ष डॉ. देविदास वायदंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला संस्थेचे प्राधान्य असल्याचे सांगितले. कार्यक्रमास उपाध्यक्ष सायली सुके, ग्रुप संचालक सागर सुके, इन्स्टिट्यूट प्रमुख डॉ. गणेश हिंगे, संचालक डॉ. सुहास पाखरे, प्राचार्य डॉ. किशोर ओतारी, प्रा. पंकज भोकरे, डॉ. बाळासाहेब भमनगोळ, डॉ. सुनील खिलारी, डॉ. नीलेश लिंबोरे व डॉ. प्रमोद जाधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT