पुणे

वडगाव काशिंबेगला विविध कार्यक्रम

CD

मंचर, ता. ६ : श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान येथे शुक्रवारी (ता. ६) संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ‘मोरया’च्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता.
पहाटे पुजारी जगदीश जोशी यांनी गणपतीची विधिवत पूजा केली. त्यानंतर मंचर येथील हरिश्‍चंद्र गाडे, बैलगाडा मालक सचिन मोढवे, रोहित सुनील पिंगळे, संतोष कडूसकर, दुर्गा पिंगळे, शैलेश गायकवाड, महेंद्र घोडेकर व स्वराज हांडे यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला.
यावेळी बैलगाडा मालक सचिन मोढवे यांनी नवसपूर्ती म्हणून सव्वा किलो वजनाचा चांदीचा गणपती अर्पण केला. आरतीनंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. लांडेवाडी, मंचर, साकोरे, घोडेगाव, नारोडी, सुलतानपूर, परिसरातील भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दुपारी उन्हाचा कडाका वाढल्याने काही काळ गर्दी कमी झाली; मात्र सायंकाळनंतर पुन्हा भाविकांची संख्या वाढली.
पेशवेकालीन अर्धपीठ गणपती मंदिरावर उद्योजक श्यामभाऊ गुंजाळ यांच्या वतीने फुलांची सजावट केली होती. तसेच मोरया मंगल कार्यालयाचे मालक सुमीत लांडे यांच्या वतीने भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. नरेंद्र ‘पापा’ घुले यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. मंदिर परिसरात हार, फुले, नारळ, पेढे व प्रसाद विक्रीची दुकानेही थाटण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : उकाड्यानंतर दिलासा! मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाची हजेरी

Manoj Tiwary : सत्ता जाताच, आपले फिरले! ममता बॅनर्जी सरकारवर भारतीय क्रिकेटपटूचे गंभीर आरोप; प. बंगालमध्ये होता क्रीडा मंत्री

Education Success: ग्रामपंचायत शिपायाची मुलगी पूर्वा कदमची बारावीत ८६ टक्के गुणांसह चमक; सीए होण्याच्या स्वप्नाला आर्थिक बळाची प्रतीक्षा

Latest Marathi News Live Update : मोबाईल चोरी अपयशी ठरल्याने महिलेवर हल्ला

Baramati Crime: फेसबुकवर स्वस्त गहूचे आमिष; व्यापाऱ्याला निर्जन ठिकाणी बोलावून रिव्हॉल्व्हरच्या धाकावर लूट

SCROLL FOR NEXT