पुणे

जगदीश मारुती यांना ‘संरक्षा’ पुरस्कार

CD

पुणे, ता. १५ ः मध्य रेल्वेतील पाचही विभागात ज्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे रेल्वे अपघात टळला आहे अशा १४ कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे विभागात जगदीश मारुती (गँगमन) यांना हा पुरस्कार मिळाला आहे. ते भिलवडी स्थानकावर २६ मार्च रोजी कामावर असताना विनागार्ड धावणाऱ्या मालगाडीच्या ब्रेक व्हॅनमधून एक वेगळा आवाज येत होता. त्यांनी तत्काळ स्थानक व्यवस्थापक यांना कळविले. किर्लोस्करवाडी स्थानकावर मालगाडी थांबवण्यात आली आणि ब्रेक व्हॅनला रेल्वेपासून वेगळे करण्यात आले. त्यामुळे अपघात टळला. मुंबई येथे आयोजित समारंभात मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक आर. के. यादव यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. पदक, प्रमाणपत्र व रोख दोन हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी अतिरिक्त सरव्यवस्थापक चित्तरंजन स्वैन, प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी एम. एस. उप्पल, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक एस. एस. गुप्ता आदी उपस्थित होते. मुंबई विभागातील ५, भुसावळ विभागातील ५, नागपूर विभागातील २ आणि पुणे व सोलापूर विभागातील प्रत्येकी एक कर्मचाऱ्यास हा सन्मान दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

Rohit Sharma Video: रोहित टीम बसमधून उतरताना पाय घसरून पडला, पोलिसांसह सारे सावरायला धावले; विराट लांब उभा राहून फक्त...

अभिनेत्री रकुलप्रीत सिंगच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी; चित्रपटांच्या नावाखाली परदेशात पैसा पाठवत असल्याचा संशय

दुष्काळाच्या झळा! सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Latest Marathi News Live Update : पाण्यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामस्थांचा रास्ता रोको.. पाण्यासाठी मेंढ्याही रस्त्यावर

SCROLL FOR NEXT