पुणे

समाजातील विकृती रोखण्याचे सामर्थ्य संत विचारांत

CD

नर्सी (जि. हिंगोली) : संत चोखामेळा साहित्य संमेलनानिमित्त शनिवारी काढलेल्या ग्रंथदिंडीत सहभागी बाल वारकरी.
--------------
सामजिक विकृती रोखण्याचे
सामर्थ्य संतविचारांत : देशमुख
-----
नर्सीत तिसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन
------
सकाळ वृत्तसेवा
नर्सी (जि. हिंगोली), ता. २४ : ‘‘आज माणूस माणसापासून दूर जात आहे. वाढती सामाजिक विकृती दूर करून माणसांमधील नाती जोडण्याची ताकद केवळ संतांच्या विचारांत आहे. त्यामुळे सुंदर आणि समृद्ध समाजासाठी संत साहित्याचा जागर करणे आवश्यक आहे’’, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी तथा संत साहित्याचे अभ्यासक इंद्रजित देशमुख यांनी केले.
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जन्मगावी नर्सी येथे शनिवारी (ता. २४) सकाळी दहाला तिसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे उद्‍घाटक म्हणून ते बोलत होते. आळंदी येथील संत चोखामेळा अध्यासन केंद्र, पुणे येथील वृंदावन फाउंडेशन आणि श्री संत नामदेव महाराज संस्थान यांच्या वतीने हे दोनदिवसीय संमेलन होत आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ. विठ्ठल जायभाये आहेत.

देशमुख म्हणाले, ‘‘सत्ता नश्वर असून, सत्ताधारी माजी होतात; मात्र संत कधीच माजी होत नाहीत, म्हणूनच आज शेकडो वर्षांनंतरही संतांच्या पालख्या निघतात. इतरांचे जगणे समृद्ध करताना स्वतःचे जीवन कसे समृद्ध होते, ही शिकवण संत साहित्याने दिली. संत शिरोमणी नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत पोचवली आणि इतर संतांनाही लेखनासाठी प्रेरित केले.’’ डॉ. शंकर पजई यांनी प्रास्ताविक केले. गणेश येवले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. किशोर इंगोले यांनी आभार मानले.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Career Growth: ज्याला तीन लाख वार्षिक पगाराच्या कामावरून कंपनीने काढलं, त्याच तरुणाला आली दुबईतील १.५ कोटींच्या नोकरीची ऑफर

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

पुढच्या सात दिवसांत ४ राशींचं नशीब चमकणार! धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे योग

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

CBI Arrests ED officers : दुसऱ्यांवर धाडी टाकणाऱ्या ED अधिकाऱ्यांवरच CBI ची झडप! केसमधून वाचवण्यासाठी केला होता 'हा' मोठा सौदा

SCROLL FOR NEXT