पुणे

आळंदीत माउलींचा जन्मोत्सव, कृष्ण जन्माष्टमीचा सप्ताह

CD

आळंदी, ता. २७ : संत ज्ञानेश्‍वर माउलींचा जन्मोत्सव आणि कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आळंदी देवस्थानच्यावतीने माउलींच्या संजीवन समाधी मंदिरामध्ये शनिवार (ता. २९) ते शनिवार (ता. ५) पर्यंत हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे. या निमित्ताने आळंदीकर भाविकांना नामवंत कीर्तनकारांची कीर्तने-प्रवचने श्रवण करण्याचा लाभ मिळणार आहे. शुक्रवारी (ता. ४) संत ज्ञानेश्‍वर माउलींचा जन्मोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार असून, गोपाळकाला शनिवारी (ता. ५) काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.
माउलींचा जन्मोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त होणाऱ्या हरिनाम सप्ताहामध्ये दररोज दुपारी चार ते सायंकाळी पाच या वेळेत प्रवचन आणि रात्री साडेसहा ते साडेआठ कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाचा प्रारंभ शनिवारी (ता. २९) होणार आहे. चैतन्य महाराज कबीर, उमेश महाराज दशरथे, विवेक महाराज रामदासी, चंद्रकांत महाराज वांजळे, यशोधन महाराज साखरे, प्रमोद महाराज जगताप, योगी निरंजननाथ यांची प्रवचने होतील.
बडवे महाराज, पुरुषोत्तम महाराज पाटील, देहूकर महाराज संस्थान, बाळासाहेब शेवाळे, जोग महाराज संस्थान, माधव महाराज रामदास, भावार्थ देखणे यांची कीर्तने होणार आहेत. शनिवारी (ता. ५) सकाळी नऊ ते अकरा बापूसाहेब मोरे देहूकर यांचे काल्याचे कीर्तन आणि हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. दरम्यानच्या काळात दररोज रात्री आळंदीकर ग्रामस्थांचे भजन होणार आहे. तर माउली जन्मोत्सवानिमित्त दररोज अन्नप्रसादाचा कार्यक्रम असणार आहे.

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाची सरकारला धास्ती! विखे पाटलांची सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Teachers Post : राज्यातील १३ हजार ११९ उमेदवारांची ‘शिक्षक’ पदासाठी निवड

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune News : ‘आयसर’मध्ये आंदोलनाचा भडका; प्रशासनाच्या मनमानी कारभारावर ठपका

Shubman Gill on IND vs SL Draw: "२५० षटकं अन् सलग तीन दिवस फिल्डिंग..." फॉलोऑननंतरही सामना ड्रॉ राहिल्याबद्दल गिल काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT