आळंदी (ता. खेड) - संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त रविवारी कीर्तन करताना संत नामदेव महाराजांचे वंशज ज्ञानेश्‍वर महाराज नामदास.
आळंदी (ता. खेड) - संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त रविवारी कीर्तन करताना संत नामदेव महाराजांचे वंशज ज्ञानेश्‍वर महाराज नामदास. 
पुणे

नामा म्हणे आतां लोपला दिनकर। बाप ज्ञानेश्‍वर समाधिस्थ ।।

सकाळवृत्तसेवा

आळंदी - टाळ-मृदंगांचा टिपेला पोचलेला गजर अन्‌ माउलीनामाच्या अखंड जयघोषात रविवारी (ता. १३) दुपारी साडेबारा वाजता माउलींच्या समाधीवर मंदिरात मोजक्‍या वारकऱ्यांनी फुलांची मुक्त उधळण केली. संत ज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा गहिवरलेल्या वातावरणात झाला. संत नामदेव महाराज यांचे सतरावे वंशज ज्ञानेश्वर महाराज नामदास यांच्या सुश्राव्य वाणीतून समाधी प्रसंग ऐकताना देऊळवाड्यातील वारकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. 

कार्तिक वद्य त्रयोदशीनिमित्त साडेआठच्या सुमारास महाद्वारात गुरू हैबतबाबा यांच्या वतीने ऋषिकेश आरफळकर यांचे कीर्तन झाले, तर साडे दहा वाजता वीणा मंडपात नामदेव महाराजांचे वंशज ज्ञानेश्वर महाराज नामदास यांचे माउलींच्या समाधी प्रसंगाचे कीर्तन सुरू झाले. सव्वा अकराच्या सुमारास अकरा ब्रह्मवृंदांनी मंत्रघोषात समाधीवर माउलींचे रूप साकारण्यास सुरुवात केली. 

देऊळवाडा स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या उपस्थितीने पूर्ण भरून गेला होता. वीणा मंडपात ज्ञानेश्वर महाराज नामदास यांनी कीर्तनात ‘ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दिनजन,’ असे म्हणत समाधिप्रसंगाचे वर्णन करण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात समाधीची सजावट सुरू होती. बाराच्या सुमारास वीणा मंडपातून संत नामदेव महाराजांच्या पादुका समाधीजवळ ठेवण्यात आल्या. या वेळी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. अभय टिळक आणि ॲड. विकास ढगे यांनी पादुकांची पूजा केली.

विश्वस्त योगेश देसाई, बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, पोलिस ज्ञानेश्वर साबळे, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त ॲड. माधवी निगडे आदी उपस्थित होती. नामदास महाराजांनी कीर्तनातून ‘अवघी जयजयकारे पिटीयेली टाळी, उठली मंडळी वैष्णवांची, सहमंडळी सारे उठले ऋषिश्वर, केला नमस्कार समाधिसी,’ असे कीर्तनात सांगताच उपस्थित भाविकांचे अश्रू दाटून आले. सातशे पंचवीस वर्षांपूर्वीच्या समाधी प्रसंगाच्या आठवणीने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. आता माऊलींचा समाधी प्रसंग जवळ येऊन ठेपला होता. नामदेव महाराजांच्या पादुकांच्या पूजनानंतर भाविकांनी घंटानाद करून फुलांची मुक्त उधळण करीत पुडंलिका वरदे हरी विठ्ठल आणि माउलीनामाचा जयघोष केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांच्या सगेसोयऱ्यांची दाटी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी आणि परिसरात संचारबंदी लागू आहे. देऊळवाड्यातही वारकऱ्यांना प्रवेश नव्हता. राज्य सरकारने घातलेल्या बंदीमुळे लाखो वारकरी घरी थांबले. मात्र, बंदोबस्तावरील पोलिसांचे सगेसोयरे आणि आळंदी परिसरातील अनेक नागरिकांना मात्र मुक्त प्रवेश होता. पिढ्यान्‌पिढ्या ज्यांच्या घरात वारी होती, त्यांना घरी बसावे लागले. दुसरीकडे ‘वशिल्या’ची वारी मात्र बंदोबस्तावरील पोलिसांच्या कृपेने अनेकांना झाली. आज समाधी प्रसंगाच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही पालन झाले नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT