पुणे

दिवेघाटाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार

CD

पुणे, ता. १४ ः श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवेघाट हा टप्पा १३.२५ किलोमीटर लांबीचा आहे. दिवेघाटाच्या रुंदीकरणास १७ एकर जागेची आवश्यकता होती. वन विभागाकडून ती जागा मिळण्यास उशीर झाला. आतापर्यंत या भागातील ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. दिवेघाटाचे काम पूर्णत्वास जाण्यास डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाची गडकरी यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या बसमधूनच प्रवास केला. फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पालखी मार्गाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते. श्री संत ज्ञानेश्वर पालखी महामार्ग हा आळंदी -वाखरी- पंढरपूर- मोहोळ असा आहे. याची एकूण लांबी २३४ किलोमीटर असून, या प्रकल्पासाठी सुमारे ७ हजार ६२५ कोटी रुपयांचा खर्च आला. हा मार्ग पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून जातो.
---------------
सहापैकी चार टप्पे पूर्ण
या पालखी मार्गाचे काम एकूण सहा टप्प्यांमध्ये केले आहे. यात मोहोळ ते वाखरी, वाखरी ते खुडूस, खुडुस ते धरमपुरी, धरमपुरी ते लोणंद, लोणंद ते दिवेघाट व दिवेघाट ते हडपसर. यातील चार टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. यापैकी धरमपुरी ते लोणंद दरम्यान ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे तर दिवेघाट ते हडपसर या टप्प्यातील ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण होण्यास आणखी सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
--------------
काय म्हणाले गडकरी :
- दिवेघाट पूर्वी दोन पदरी होता. वाहनांसाठी चार पदरी मार्गिका असेल.
- वारकऱ्यांसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने ३.५ मीटर स्वतंत्र मार्गिका. याला ‘पालखी पथ’ संबोधले आहे. दिवेघाटात एकूण सहा मार्गिका.
- या मार्गावरील पुलावर जाण्यासाठी इलेक्ट्रिक लिफ्ट बसवली जाईल. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांची सोय होईल.
- या मार्गावर ४० हजारांहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत तर ४५० झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले.
-महामार्गासाठी ज्या ठिकाणाहून मुरूम वापरण्यात आला. त्या ठिकाणी ४६ तलाव बांधण्यात आले. याचा फायदा ३३ लहान गावांना होणार आहे.
- महामार्गावरील ऐतिहासिक अहिल्या विहीर व बाजीराव विहीर यांचे जतन करण्यात आले.
-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

SCROLL FOR NEXT