पुणे, ता. ६ : आषाढी एकादशीनंतर परतीच्या प्रवासाला निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे गुरुवारी पुण्यात आगमन झाले. वरुणराजाच्या साक्षीने आणि टाळ-मृदंगाच्या गजरात दोन्ही पालख्यांचे शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. दोन्ही सोहळे पुण्यात दोन दिवस मुक्काम करणार असून, शनिवारी (ता. ८) मार्गस्थ होतील.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पहाटे तीन वाजता हडपसर येथून निघाला. पहाटे चार वाजता शिंदे छत्री येथे विसावा घेतल्यानंतर पालखी साडेपाचच्या सुमारास भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात पोहोचली. समाजआरतीनंतर सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी विसावला. या वेळी सोहळाप्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त पुरुषोत्तम पाटील, विविध मानकरी, दिंडीप्रमुख आणि वारकरी उपस्थित होते. शनिवारी सकाळी १० वाजता पालखी आळंदीकडे प्रस्थान करेल.
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सकाळी सहा वाजता कुंजीरवाडी येथून मार्गस्थ झाला. दिवसभराच्या प्रवासानंतर दुपारी सव्वाचारच्या सुमारास पालखी नवी पेठेतील विठ्ठल मंदिरात पोहोचली. सोहळाप्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, उमेश महाराज मोरे यांच्यासह मानकरी आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसाच्या सरींमध्येच भाविकांनी फुलांची उधळण करत पालखीचे स्वागत केले. नवी पेठेतील विठ्ठल मंदिरात श्री संत तुकाराम महाराज पालखीचा दोन दिवस मुक्काम असेल. त्यानंतर शनिवारी सकाळी सात वाजता पालखी पिंपरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी :
- भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात दोन दिवस मुक्काम
- शनिवारी सकाळी १० वाजता आळंदीकडे मार्गस्थ
श्री संत तुकाराम महाराज पालखी :
- नवी पेठेतील विठ्ठल मंदिरात दोन दिवस मुक्काम
- शनिवारी सकाळी ७ वाजता पिंपरीकडे मार्गस्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.