संत गाडगेबाबांचा संदेश आचरणात आणा
अनिल सावंत; वाईत विविध उपक्रमांनी जयंती कार्यक्रम उत्साहात
वाई, ता. २४ : संत गाडगेबाबा महाराजांनी स्वच्छता, सेवा आणि समाजजागृतीचा जो संदेश दिला, तो प्रत्येक नागरिकाच्या आचरणात आला पाहिजे. संतांच्या विचारांवर चालणारे शहरच खऱ्या अर्थाने प्रगत होते, असे प्रतिपादन नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी केले.
संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त परीट समाजाच्या वतीने संत गाडगेबाबा महाराज नगरपालिका शाळा नंबर सहा येथील समाजमंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी उपनगराध्यक्ष घनशाम चक्के, नगरसेवक भारत खामकर, प्रसाद बनकर, नगरसेविका अपर्णा जमदाडे, पद्मा पाडळे- जाधव, माजी नगरसेविका स्मिता हगीर, धनंजय हगीर, मोहन काटकर, संतोष जमदाडे, प्रवीण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. सावंत म्हणाले, ‘‘संत गाडगेबाबा महाराजांनी स्वच्छतेचा आणि मानवतेचा जो दीप प्रज्वलित केला. तो आजही दिशादर्शक आहे. त्यांनी केवळ उपदेश केला नाही, तर स्वतः झाडू हातात घेऊन समाजाला आदर्श घालून दिला. त्यांच्या विचारांनुसार प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रगत करण्यासाठी पुढाकार घ्यावा. समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे, हा त्यांचा संदेश आपण कृतीतून जपू या.’’
श्री. खामकर व श्री. बनकर यांनी समाजसेवेचा आदर्श पुढील पिढ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न असल्याची भावना व्यक्त करून संत गाडगेबाबांच्या विचारातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार केला.
सकाळी समाजबांधवांच्या वतीने संत गाडगेबाबांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या विचारांवर आधारित संदेश देण्यात आला. लाखानगर भजनी मंडळाने भजन सेवा केल्याबद्दल सर्व कलावंतांचा सत्कार करण्यात आला. अशोक दळवी, ज्ञानेश्वर वाघ, बंडू दळवी, प्रदीप दळवी, उमेश माने, शीतल पवार, वैशाली पवार, सुषमा सपकाळ यांनी स्वागत केले. कुमार पवार यांनी सूत्रसंचालन केले.
----------------------------------
07617
वाई : संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादनप्रसंगी अनिल सावंत, घनशाम चक्के, भारत खामकर, प्रसाद बनकर, अपर्णा जमदाडे, पद्मा जाधव, स्मिता हगीर व समाज बांधव.
----------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.