पुणे

संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासमेलन

CD

लोगो : NGP26I10508
फोटो : NGP26I10512
नागपूर : संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पगडी, वीणा, चिपळ्या देऊन ‘संत नामदेव महाराज विश्व पुरस्कार’ प्रदान करताना स्वामी जितेंद्रनाथ महाराज.
-----
नामदेवांच्या शिकवणीनुसार
व्यक्तिनिर्माण करावे : गडकरी

संत नामदेव महाराज विश्व महासंमेलन उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. २२ : ‘‘संत नामदेव महाराजांनी देशभर भ्रमंती करीत अभंगांद्वारे प्रबोधन केले. नामदेवांनी दिलेल्या या धार्मिक विचारांच्या आधारावर सामर्थ्यशाली राष्ट्र निर्मितीसाठी व्यक्तिनिर्माणाचे कार्य करायला हवे,’’ अशी अपेक्षा मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

रेशीमबाग मैदानावर संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी उद्घाटन सत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री देवनाथ महाराज मठाचे (अंजनगाव सुर्जी) पीठाधीश स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी भूषविले. यावेळी नामदेव महाराजांचे १६ वे वंशज विठ्ठल नामदास महाराज, प्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव, सप्त खंजिरी वादक सतपाल महाराज, खासदार अनिल बोंडे, आयोजन समितीचे मुख्य संयोजक ईश्वर धिरडे, अध्यक्ष भास्करराव टोंपे आणि संत मंडळी, शिंपी समाज बांधव प्रतिनिधी उपस्थित होते.

या सोहळ्यात नितीन गडकरी यांना ‘संत नामदेव महाराज विश्व पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नितीन गडकरी यांनी देशातील संतांच्या मिळालेल्या वारशाचा उल्लेख करत त्यांचे विचार आचरणात आणायचे आव्हान केले.एकतेचा मंत्र संत नामदेव महाराजांनी दिला. या आधारे व्यक्तिनिर्माणाचे कार्य केल्यास विश्व एकात्मतेचे आपले ध्येय पूर्ण होईल, असेही ते म्हणाले. विठ्ठल नामदास, सतपाल महाराज यांनी उपस्थितांना आशीर्वचन दिले.
-----
बॉक्स
नामदेवांना ‘भारतरत्न’ प्रदान करावा : जितेंद्रनाथ महाराज

‘‘संत नामदेवांनी संपूर्ण भारत भ्रमण करून वारकरी संप्रदाय देशभर पोहोचवला. त्यामुळे भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ प्रदान करायला हवा,’’ अशी भावना स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी व्यक्त केली. विश्वात असलेली अशांती मानवाच्या अहंकारामुळे आहे. मानवाचा अहंकार दूर करण्याचे कार्य पूर्वी संतांनी केले. यापैकी एक असलेल्या नामदेव महाराजांच्या तपोबल, कार्यबलाला तोड नाही. नामदेव महाराजांच्या आदर्शांवर कार्य करणाऱ्या शिंपी समाजात भारताला अखंड ठेवण्याची ताकद आहे, असेही आशीर्वचन जितेंद्रनाथ महाराजांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Car Bomb Attack : आमदार शौकत मोल्ला यांच्या कारवर बॉम्ब हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ!

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतील कोस्टल रोडजवळ भीषण आग

Missing Link project: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सुरू होताच टोल दरात बदल होणार का? नवीन नियम काय? महत्त्वाची माहिती आली समोर

T20 WC, IND vs SA: अक्षर पटेलला संधी नाहीच; दक्षिण आफ्रिका संघात तब्बल ४ बदल; Super-8 सामन्यासाठी पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT