TMB26B03801
माढा : तालुक्यातील भुईंजे येथील संतशिरोमणी गुरू रविदास महाराज मंदिरात संत रविदास महाराज यांची 649 वी जयंती विविध कार्यक्रमाद्वारे उत्साहात साजरी केली.
---
संत रविदासांनी श्रद्धेचा मार्ग दाखविला
ॲड. प्राची सरवदे; भुईंजे येथे प्रवचन, सामाजिक उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
टेंभुर्णी, ता. ३ : संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांनी अंधश्रद्धेचा मार्ग मोडून काढत श्रद्धा, मानवता आणि विवेकाचा मार्ग समाजासमोर ठेवला. मन निर्मळ झाल्याशिवाय परमार्थ घडत नाही. त्यामुळे प्रत्येकाने संतांच्या शिकवणीनुसार जीवन जगले पाहिजे, असे प्रतिपादन युवा कीर्तनकार ॲड. प्राची सरवदे यांनी केले.
माढा तालुक्यातील भुईंजे येथील संत शिरोमणी गुरू रविदास महाराज मंदिरात महाराजांच्या ६४९ व्या जयंतीनिमित्त आयोजित प्रवचन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
प्रवचनात सरवदे म्हणाल्या की, चंदनाप्रमाणे संतांमध्ये सगुण असतात. आईचे प्रेम आपल्या लेकरापुरते मर्यादित असते; मात्र संतांचे प्रेम विश्वातील सर्व सृष्टीसाठी असते. कुटुंबात एकी असेल तर घरात समाधान नांदते. गुरूचा आशीर्वाद मस्तकावर असल्यास खडतर प्रवासही सुखकर होतो. वित्तबळ व ज्ञानबळासोबत शरीरबळही महत्त्वाचे असून, संत रविदास महाराजांनी अंधश्रद्धेचा पगडा दूर करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मंदिराचे विश्वस्त राजाभाऊ शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमानंतर आरती, लंगर वाटप तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास चंद्रकांत कांबळे, प्राचार्य रोहिदास सोनवणे, अमित शिंदे, रामभाऊ भगत, मधुकर भगत, भगवान खरात, किरण लोंढे यांच्यासह टेंभुर्णी परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.