pune sakal
पुणे

Pune : ‘स्थळ’ चित्रपटाला संत तुकाराम पारितोषिक ; ‘सिटीझन सेंट’ उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट; पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा समारोप

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) जागतिक चित्रपट स्पर्धेत टिनाटीन कजरिशविली यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सिटीझन सेंट’ या चित्रपटाला उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे राज्य सरकारचे प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे पारितोषिक मिळाले, तर जयंत सोमळकर दिग्दर्शित ‘स्थळ’ या मराठी चित्रपटाने ‘संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचे पारितोषिक पटकाविले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. २५ : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) जागतिक चित्रपट स्पर्धेत टिनाटीन कजरिशविली यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सिटीझन सेंट’ या चित्रपटाला उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे राज्य सरकारचे प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे पारितोषिक मिळाले, तर जयंत सोमळकर दिग्दर्शित ‘स्थळ’ या मराठी चित्रपटाने ‘संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचे पारितोषिक पटकाविले.

महाराष्ट्र सरकार आणि पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित २२व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप गुरुवारी झाला. याप्रसंगी विविध पारितोषिकांची घोषणा करण्यात आली. या वेळी महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, नॉर्थ अमेरिका मराठी चित्रपट असोसिएशनचे अध्यक्ष अभिजित घोलप, पुणे फिल्म फाउंडेशनचे सरचिटणीस रवी गुप्ता, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, विश्वस्त सतीश आळेकर, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांसह आंतरराष्ट्रीय ज्युरी, चित्रपट निवड समितीचे सदस्य उपस्थित होते.

यंदा महोत्सवात जॉर्जिया या देशातील ‘सिटीझन सेंट’ या चित्रपटाला राज्य सरकारचा ‘प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट’ हा १० लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला, तर मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट या गटात ‘स्थळ’ या चित्रपटाला राज्य सरकारचा ‘संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ हे पाच लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी असणारे विशेष पारितोषिक आयेशा जैन या विद्यार्थिनीला देण्यात आले.

गटात मिळालेली पारितोषिके...

  • चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारे पुरस्कार पुढीलप्रमाणे :

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक : श्रीकांत प्रभाकर (चित्रपट- भेरा)

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता : देवा गाडेकर (चित्रपट - वल्ली)

  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : स्वाती गोटावळे (चित्रपट- छबिला)

  • सर्वोत्कृष्ट पटकथा : जयंत दिगंबर सोमळकर (चित्रपट- स्थळ)

  • सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफर : विजय मिश्रा (चित्रपट- श्यामची आई)

  • ज्युरीकडून विशेष पारितोषिक

  • सर्वोत्कृष्ट अभिनय : बालकलाकार कबीर (चित्रपट-जिप्सी)

  • सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक : श्रीकांत प्रभाकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : दुकाने फोडणारा परराज्यातील सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT