पुणे

तुकाराम बीज बातमी

CD

SLC26B28337
सोलापूर : होताच संत तुकाराम महाराजांना गुलाल अर्पण करताना महिला भाविक.
......
SLC26B28339
सोलापूर : गुलाल अर्पणानंतर संत तुकाराम महाराजांची आरती घेऊन ते तेज स्वतःमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करताना भाविक.
...
PNE26W00982
श्री विठ्ठल-रुक्मिणी यांना केलेली फुलांचे आरास.
......
SLC26B28338
संत तुकाराम महाराजांचा केलेला शृंगार.
.........
देव भावाचा भुकेला, तुका वैकुंठासी नेला
अशोक चौकातील तुकाराम मंदिरात ३७५ वा बीज सोहळा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ५ : फाल्गुन वद्य द्वितीया, प्रथम प्रहर आणि प्रातःकाळची ती मंगल वेळ... संत तुकाराम महाराज वैकुंठ गमनासाठी विमानात बसले आणि ‘भले मज आता निरोप द्यावा’ असे म्हणून त्यांनी आपली सेवा पांडुरंगाला अर्पण केली. बरोबर ३७५ वर्षांपूर्वी देहूमध्ये घडलेला हा अलौकिक प्रसंग अशोक चौक येथील संत तुकाराम महाराज मंदिरात भाविकांनी भावपूर्ण वातावरणात अनुभवला.
ह. भ. प. वैकुंठवासी शिवराम महाराज मोरे यांनी उभारलेल्या या मंदिरात तुकाराम बीज सोहळा मोठ्या भक्तीभावात साजरा झाला. यावेळी ह. भ. प. विष्णुपंत मोरे यांनी ‘आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी...या अभंगावर गुलालाचे कीर्तन केले. ‘वाडवेळ जाला, उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलावितो’ या ओळींचे निरूपण होताना उपस्थित हजारो भाविक भक्तीत न्हाऊन निघाले. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता ‘अंतकाळी विठू आम्हासी पावला, कुडीसहित झाला गुप्त तुका’ या जयघोषात गुलालाची उधळण करण्यात आली.

​सप्ताहाची सांगता आणि महाप्रसाद
गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता गुरुवारी सायंकाळी ह.भ.प. भगवंत महाराज मोरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या सोहळ्याला मृदंग साथ ह.भ.प. चैतन्य महाराज मोरे, निवृत्ती महाराज मोरे, मुकुंद महाराज मोरे आणि ज्योतिराम महाराज मोरे यांनी दिली. सोहळ्यानंतर १००० भाविकांना खिरीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.
---------
मोरे घराण्याने जपलेला वारसा
​या मंदिराची स्थापना ह.भ.प. वैकुंठवासी शिवराम महाराज मोरे यांनी केली असून, आज ही परंपरा त्यांच्या पुढच्या पिढीने तितक्याच श्रद्धेने पुढे नेली आहे. शहरातील तुकाराम महाराज मंदिरात दरवर्षी भाविकांची संख्या वाढत असून सोलापूरच्या आध्यात्मिक नकाशावर या सोहळ्याला विशेष स्थान प्राप्त झाले आहे.
-----------
​सप्तरंगी भक्तीचा सात दिवसांचा सोहळा
​या मंदिरात केवळ बीज सोहळाच नव्हे, तर गेले सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेची काकड आरती, गाथा भजन, आणि सायंकाळचे कीर्तन अशा भरगच्च कार्यक्रमांनी अशोक चौक परिसर विठ्ठलमय झाला होता. भाविकांना मिळालेला खिरीचा महाप्रसाद हा या सात दिवसांच्या श्रमाचा गोडवा ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT