Vidura-and-Bapusaheb 
पुणे

‘संत तुकाराम’च्या अध्यक्षपदी नवले

सकाळवृत्तसेवा

पौड - श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी खासदार विदुरा नवले; तर उपाध्यक्षपदी बापूसाहेब भेगडे यांची बिनविरोध निवड झाली. कारखान्याच्या स्थापनेपासून सलग चोवीस वर्षे बिनविरोध अध्यक्षपद भूषविण्याचा मान नवले यांना मिळाला आहे.

या कारखान्याची संचालकांची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. त्यामध्ये नवले यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी कारखान्याच्या कार्यालयात संचालकांची बैठक झाली. त्यात सर्व संचालकांनी अध्यक्षपदासाठी नवले यांच्या नावाचा आग्रह धरला. उपाध्यक्षपदासाठी बापूसाहेब भेगडे यांचे नाव अंतिम केले. दोन्ही पदांची औपचारिक घोषणा केल्यानंतर संचालकांनी दोघांचाही सन्मान केला. 

‘या कारखान्यावर संत तुकारामांचा आशीर्वाद आहे. तसेच, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध पक्षांच्या दिग्गज मंत्री, पदाधिकाऱ्यांचे या कारखान्याला निरपेक्ष सहकार्य लाभत आले आहे. आतापर्यंतच्या संचालकांनी त्यागी वृत्तीने सभासदांच्या प्रगतीसाठी काम केले. 

सभासदांनीही संचालकांवर विश्वास टाकला. भविष्यातही या कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादनाबरोबरच इतरही उत्पादने सुरू करून शेतकऱ्यांना आर्थिक ताकद देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत,’’ असे नवले यांनी निवडीनंतर सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी, जय पवार म्हणाले, बिनविरोधसाठी आमचा प्रयत्न पण...

MI vs DC Live : सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, नमन धीरने मुंबई इंडियन्सची लाज वाचवली; दिल्लीच्या गोलंदाजांसमोर इतरांची शरणागती

Latest Marathi News Live Update : दादांच्या विमान अपघाताचा फायनल अहवाल आल्यावर सविस्तर बोलेन – जय पवार

"मी पैशांसाठी बिग बॉस केलं" लपंडाव फेम रुपालीचा धक्कादायक खुलासा ; म्हणाली..

Mumbai Crime: नवरा कामावरुन परतला, बायको दारुच्या नशेत तर्रर्र; मोहम्मद कुरेशीवर पत्नीचा चाकूहल्ला

SCROLL FOR NEXT