पुणे

सोनपीरवाडी येथे वारकऱ्यांना मिष्टान्नाचे जेवण

CD

सुपे, ता. १६ : सोनपीरवाडी (ता. बारामती) येथे वडगावबांडे (ता. दौंड) येथील संत सद्‍गुरू यादव बाबांच्या पालखीचे मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त स्वागत केले. याप्रसंगी वारकऱ्यांना मिष्टान्नाचे भोजन देण्यात आले, यामुळे सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले.
वडगावबांडे ग्रामस्थांच्या सहकार्याने संत यादव बाबांच्या पालखीची ही पहिलीच पंढरीची वारी आहे. या पहिल्याच मुक्कामात मुस्लिम बांधवांनी केलेल्या आदरातिथ्याने वारकरी भारावून गेले, अशी भावना शिवाजी गरदडे यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद सदस्या पल्लवी खेत्रे यांच्या वतीने वारकऱ्यांना आरोग्य किट आणि रेनकोटचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच मीरा रसाळ, दत्तात्रय वाबळे, अजमभाई इनामदार, बाळुभाई इनामदार, गुलाबभाई इनामदार, नाना लोंढे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्याच वारीत मिळालेल्या या प्रेमामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक यांची प्रकृती अत्यंत गंभीर, हाडे दिसू लागली; डॉक्टरांनी दिला अवयव निकामी होण्याचा इशारा

Satara News: साताऱ्यात धक्कादायक घटना! निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना मारहाण; जिल्ह्यात उडाली खळबळ, नेमकं काय कारण?

Latest Marathi News Live Update : मुंबईतील भेसळयुक्त दुधाच्या पॅकेजिंगचा पर्दाफाश, प्रशासनाची मोठी कारवाई

ROHIT SHARMA RETIREMENT ? रोहित शर्मा क्रिकेटला अलविदा म्हणणार ? लंडनमध्ये आई-वडील पोहोचताच चर्चांना वेग, लॉर्ड्समध्येच होणार मोठी घोषणा?

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदी स्वस्त! खरेदीदारांना दिलासा; तुमच्या शहरात ताजे दर पाहा

SCROLL FOR NEXT