पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी सन्मानित केलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी. Sakal
पुणे

संतोष जाधव प्रकरण : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथकातील चार जणांचा सन्मान

पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व एक लाख रुपये रोख बक्षीस

रविंद्र पाटे

नारायणगाव - स्वतःचा जीव धोक्यात घालून सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील संशयित आरोपी व मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी संतोष सुनील जाधव याला मोठ्या शिताफीने गुजरात राज्यातून अटक केल्याबद्दल पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथकातील अधिकारी व कर्मचारी आशा चार जणांना पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व एक लाख रुपये रोख बक्षीस देऊन सन्मानित केले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे पथकातील सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, हवालदार विक्रम तापकीर, नाईक संदीप वारे, नाईक अक्षय नवले यांचा प्रशस्तीपत्रक व एक लाख रुपये रोख बक्षीस देऊन गौरव केला आहे.

संतोष जाधव याने एक वर्षापूर्वी मंचर येथील युवकाचा खून केला होता. त्या नंतर जाधव फरार झाला होता. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.जाधव याने खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील काही तरुणांना टोळीत सक्रिय करून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान जाधव हा बिश्नोई टोळीत सक्रिय झाला होता. सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील संशयित आरोपी म्हणून संतोष जाधव असल्याचे पुढे आले होते. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष जाधव याचा शोध पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथकातील अधिकारी व कर्मचारी घेत होते.

दरम्यान जाधव याचा सहकारी सिद्धेश कांबळे याला स्थानिक गुन्हे पथकाने बोटा(ता.संगमनेर) येथून अटक केली. त्या नंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, हवालदार विक्रम तापकीर, नाईक संदीप वारे, नाईक अक्षय नवले यांनी गुजरात राज्यात जाऊन छोट्याश्या खेड्यात लपून बसलेल्या जाधव याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलिसांनी जाधव टोळीतील सात सदस्यांना खेड व आंबेगाव तालुक्यात अटक करून त्यांच्याकडून तेरा गावठी पिस्तूल, एक बुलेट कॅरियर, मॅक्झिन, बोलेरो गाडी, मोबाईल आदी मुद्देमाल जप्त केला.

जाधव याला अटक करण्यात महत्वाची भूमिका बजावलेले सहायक पोलीस निरीक्षक गंधारे, हवालदार तापकीर, नाईक वारे, नाईक नवले यांना पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख सन्मानित केल्याने पोलिसांचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर मोठी घटना, प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला अचानक लागली आग, अग्निशमन दल घटनास्थळी

Crime News : भगवा दुपट्टा घालून मांसाहार केल्याने तरुणाला मारहाण, पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात... नेमका कुठं घडला प्रकार?

Ganeshotsav 2025 : 'शंकराचा बाळ आला’ – सूर, श्रद्धा आणि भावनांचा सुंदर संगम; गणेशोत्सवासाठी नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : एकनाथ शिंदे यांनी आज महापालिकेच्या आपत्कालीन कक्षास दिली भेट

Online Gaming Bill: ऑनलाईन गेमिंग बिल! केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; नेमका कायदा काय? कशावर येणार बंधन?

SCROLL FOR NEXT