Santosh jadhav mother told about her son story and what she face how society look her suspect in sidhu moose wala murder case pune crime  sakal
पुणे

..."त्या' संशयी नजरा, कुजबुज करणाऱ्यांना रोखु तरी कसे !

सिद्धु मुसेवाला खुन प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधवच्या आईने मांडली कैफियत

सकाळ वृत्तसेवा

मंचर/पुणे : कामाच्या ठिकाणच्या व्यक्ती, नातेवाईक, ओळखीची माणसे अजूनही माझ्याशी तितक्‍याच आपुलकीने वागत आहेत. पण, रस्त्याने ये-जा करताना माझ्याकडे पाहून लोक कुजबुज करतात, एकमेकांना त्या संतोष जाधवची आई आहे, हे सांगत त्याचे व्हिडीओ दाखवतात, संशयी नजरेने पाहतात. अशा लोकांना रोखायचे तरी कसे ? अशी उदविग्नता संगीता जाधव यांनी मांडत आपले मन मोकळे केले. "त्याने खरच खुन केला असेल, तर मी त्याला पाठीशी घालणार नाही, कायद्याने त्याला शिक्षा व्हायलाच पाहीजे, त्यानेही पोलिसांना शरण येऊन आपले निर्दोषत्व सिद्ध केले पाहीजे,'' असे भावनिक आवाहनही केले.

पंजाबी गायक व कॉंग्रेसचे युवा नेते सिद्धु मुसेवाला यांच्या खुन प्रकरणामधील संशयित व दिल्लीच्या लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सदस्य पुणे जिल्ह्यातील संतोष जाधव व त्याचा साथीदार सौरभ महाकाळ यांची नावे पुढे आली. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तत्काळ सौरभ महाकाळ ऊर्फ सिद्धेश कांबळे यास अटकही केली. मात्र ओंकार ऊर्फ राण्या बाणखेने खुन प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिस मागील वर्षापासून जाधवचा शोध घेत आहेत, मार्च महिन्यात पोलिसांनी पंजाबमध्येही त्याचा शोध घेतला होता. त्यातच मुसेवाला खुन प्रकरणात जाधवचे नाव पुढे आल्यानंतर सतर्क झालेल्या पोलिसांनी त्याचा आणखी शोध सुरु केला असला तरीही तो सापडलेला नाही. दरम्यान, संतोष जाधवच्या आईने आपल्या मुलाच्या अशा गुन्हेगारी वृत्तीचा समाचार घेतला आहे.

...आई म्हणून त्याने कधीच ऐकले नाही !

संतोष लहानपणापासून वाईट मुलांच्या संगतीत होता, भांडणे करीत. तेव्हा, त्याला रागावर आवर घालण्यास सांगत होते. त्याच्या चुकांना कधी माफ केले नाही. पण त्यानेही आई म्हणून माझे कधी ऐकले नाही. त्याचे ओंकार बाणखेलेच्या खुन प्रकरणात नाव आहे, आता मुसेवाला प्रकरणातही तेच घडले आहे. पण दोन्ही सीसीटीव्ही चित्रीकरणात माझा मुलगा दिसत नाही. त्याने गुन्हा केला असेल, तर त्याला कायद्याने शिक्षा व्हायलाच पाहीजे, त्याने काही केले नसेल, तर पोलिसांपुढे हजर राहायला पाहीजे, असे संगीता जाधव यांनी स्पष्ट केले. ""मी एक किलोमीटर चालत एका रुग्णालयात कामाला जाते. रस्त्याने ये-जा करताना लोक माझ्याकडे संशयी नजरेने बघतात. कुजबुज सुरु करतात. मोबाईलवर मुलाचे व्हिडीओ दाखवून माझ्या दिशेने खाणाखुणा करतात. हे कसे थांबवू ? कामाच्या ठिकाणच्या व्यक्ती, नातेवाईक व ओळखीच्या व्यक्तींना माझा स्वभाव माहिती आहे. ते आजही तितक्‍याच आपुलकीने वागतात. त्यांच्या वागण्यात बदल झालेला नाही. पण इतरांचे काय ? हा मानसिक त्रास किती दिवस सहन करायचा, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT