पुणे

सह्याद्रीच्या सप्तशिखरांमध्ये विराजमान सप्तशृंगी देवी मंदिरावर सव्वासात फूट उंचीचा भव्य कळस

CD

सप्तशृंगी देवी मंदिरावर
सव्वासात फूट उंचीचा कळस

हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात सोहळा

ॲग्रोवन वृत्तसेवा
सप्तशृंगगड, जि. नाशिक : सह्याद्रीच्या सप्तशिखरांमध्ये विराजमान आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवी मंदिराच्या नव्या कळसाचे रविवारी (ता. २९) आदित्य पूजनाच्या मुहूर्तावर विधिवत कलशारोहण करण्यात आले. वैदिक मंत्रोच्चार, यज्ञ-हवन आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला. या सोहळ्यामुळे श्रीक्षेत्र सप्तशृंगगडाच्या धार्मिक इतिहासात आणखी एका महत्त्वपूर्ण अध्यायाची नोंद झाली.
श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या पुढाकारातून मंदिरावर नवीन कळस बसविण्याचा संकल्प करण्यात आला होता. या कार्यासाठी राज्यासह देशभरातील भाविकांनी वस्तूरूपाने तसेच देणगीच्या माध्यमातून योगदान दिले. ट्रस्टचे अध्यक्ष तथा धर्मादाय सहआयुक्त (नाशिक विभाग) विवेक सोनुने यांच्या हस्ते कळसपूजन व कलशारोहण करण्यात आले. महामंडलेश्वर स्वामी संविदानंद सरस्वती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वैदिक विधी पार पडले.
कलशारोहणानिमित्त मंदिर, सभामंडप, यज्ञ-हवन मंडप आणि गाभारा परिसराची विविधरंगी ताज्या फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली. प्रवीण टिडणे यांच्या नियोजनातून शंकरराव जुन्नरे व सहकाऱ्यांनी पुष्पआरास साकारली. सोहळ्यास प्रशासन, पोलिस, ग्रामपंचायत, ट्रस्टचे पदाधिकारी, माजी विश्वस्त आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह हजारो भाविक उपस्थित होते.

पंचधातूचा ४८० किलो वजनाचा कळस
नाशिकजवळील अंजनेरी येथील शिल्पकार सुयोग मैंद यांनी पंचधातूपासून साकारलेला सुमारे ४८० किलो वजनाचा आणि सव्वासात फूट उंचीचा कळस सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरला. सात टप्प्यांत रचलेला हा कळस सप्तचक्रांचे प्रतीक मानला जातो. पायथ्याशी केलेले पुष्पाकृती कोरीव नक्षीकाम आणि सूक्ष्म कलाकुसरीमुळे कळसाचे सौंदर्य खुलून दिसते. सन १९९२-९३ मध्ये शिल्पकार मैंद यांनी घडविलेल्या जुन्या कळसाचाही नव्या कळसात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे परंपरेचा सन्मान राखत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात आला आहे.

फोटो ओळ :
सप्तशृंगगड, जि. नाशिक : विधिवत पूजा करून मंदिरावर बसविण्यात आलेला सव्वासात फूट उंचीचा भव्य कळस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zomato Rules: झोमॅटोवर बनावट पनीरला नो एंट्री! Analog Dairy पदार्थांवर बंदी; रेस्टॉरंट्ससाठी कडक नियम जारी

गौतम गंभीरचा 'विश्वासू' चमकला; संघ संकटात असताना पठ्ठ्या उभा राहिला, श्रेयस अय्यरला वर्ल्ड कप २०२७ साठी टफ फाईट

Tea Price Hike: 'कटिंग' ला महागाईचा कट! साखर, दूध, गॅस, चहाच्या वाढत्या खर्चामुळे दरवाढीची शक्यता

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एक ठार, १० प्रवासी गंभीर

ट्विंकल खन्नावर मुंढे इफेक्ट! तुकाराम मुंढेंनी हॉटेल चेक केलंय का…? आधी प्रश्न विचारला मग पनीर मागवलं, पुढे...

SCROLL FOR NEXT