सरस्वती विद्यामंदिरात बालबाजाराची रंगत
खाद्यपदार्थांची मेजवानी; हस्तकलेचा आविष्कार अन् व्यवहारज्ञानाची अनोखी शाळा
कऱ्हाड, ता. २ ः विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून त्याला प्रत्यक्ष अनुभवांची जोड मिळणे आवश्यक असते. याच उद्देशाने सरस्वती विद्यामंदिरमध्ये आयोजित करण्यात आलेला बालबाजार उत्साहात आणि जल्लोषात झाला. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, उद्योजकतेला आणि व्यवहारकौशल्याला वाव देणाऱ्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सी. ए. गोडबोले, विश्वस्त स्वाती भागवत, गीतांजली तासे, माधुरी साने आणि राजेश काळे यांची विशेष प्रमुख उपस्थिती होती. बालबाजारात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे आणि आकर्षक वस्तूंचे स्टॉल उभारले होते. उकडीचे मोदक, ढोकळा, आप्पे, इडली, भेळ, चटणी, सुरळीची वडी, मठ्ठा, ताक, दही धपाटे, उसळ, घरगुती डोनेट्स अशा विविध रुचकर पदार्थांनी बालबाजारात खमंग वातावरण निर्माण केले होते. पदार्थांची चव, वैविध्य आणि आकर्षक मांडणी यामुळे खवय्यांची चांगलीच पसंती मिळाली. यासोबतच विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, आकर्षक आकाशकंदील आणि विविध सजावटीचे साहित्य मांडण्यात आले होते. बालबाजाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष खरेदी-विक्रीचे व्यवहार केले. वस्तूंची किंमत ठरवणे, पैशांची देवाणघेवाण, ग्राहकांशी संवाद साधणे, वस्तूंची गुणवत्ता पारखणे, नफा-तोट्याचे प्राथमिक गणित समजून घेणे अशा अनेक गोष्टींचा अनुभव घेतला. या बालबाजाराच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका रूपाली तोडकर, वर्गशिक्षिका नीलिमा पाटील आणि नामदेव जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
PNE26W63318
कऱ्हाड ः विद्यार्थ्यांच्या बालबाजारात खरेदीसाठी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.