CET Exam Esakal
पुणे

CET Exam: सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षा पुन्हा पेपर फुटला; पुणे विद्यापीठाचा गलथान कारभार

CET Exam: सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षा पुन्हा पेपर फुटल्याचे निदर्शनास आले आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षा पुन्हा पेपर फुटल्याचे निदर्शनास आले आहे. पुणे विद्यापीठातील सेट विभागाचा गलथान कारभार यामुळे उघड झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, आज पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथील परीक्षा केंद्रावर सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रता (CET) परीक्षेत झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या.

त्यावेळी प्रश्न पत्रिकेतील सी आणि डी प्रश्न पत्रिकेला सील नसल्याचे निदर्शनास आल्याने विद्यार्थ्यांनी सार्वत्रिकरित्या बहिष्कार टाकत निषेध नोंदवला. त्याचबरोबर परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान अनेक वेळा पेपर फुटीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. आजच्या या प्रकारानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे.

काशाबाई नवले कॅालेज परीक्षा केंद्रावरील गोंधळ सुरू असून सर्व विद्यार्थी परीक्षा केंद्राच्या बाहेर आले आहेत. परीक्षा केंद्रावर पोलीस बोलावण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT