sarathi training for new entrepreneurs boost startups extension till 30th april pune Sakal
पुणे

सारथीतर्फे नवउद्योजकांना प्रशिक्षण; उद्योजकता विकास उपक्रमासाठी ३० एप्रिल पर्यंत मुदतवाढ

स्वतःचे स्टार्टअप उभारू पाहणाऱ्या मराठा अथवा कुणबी समाजातील युवकांसाठी एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : स्वतःचे स्टार्टअप उभारू पाहणाऱ्या मराठा अथवा कुणबी समाजातील युवकांसाठी एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. सरसेनापती संताची घोरपडे सारथी उद्योजकता विकास उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या नवकल्पनेला प्रत्यक्ष स्टार्टअपमध्ये रूपांतरीत होण्यासाठी सहाय्य केले जाणार आहे. राज्यातील विविध इनक्युबेशन केंद्रांमार्फत अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थे (सारथी) मार्फत ही योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाउंडेशनसाठी नोंदणीची मुदत वाढवून देण्यात आली आहे.

आता ३० एप्रिल पर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. जास्तीत जास्त उमेदवारांनी ही नोंदणी करावी, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे. मराठा किंवा कुणबी या गटातील नवउद्योजकांची एका वर्षासाठी ही निवड करण्यात येते.

अटी

- सदर विद्यार्थी किमान पदवीधर असावा

- विद्यार्थ्यांकडे स्वतःची तंत्रज्ञान व्यवसाय कल्पना असावी

- एका वर्षामध्ये त्याने कल्पनेचे रूपांतर स्केलेबल टेक्नॉलॉजी बिझनेस स्टार्टअपमध्ये करणे आवश्यक आहे

- आर्थिक साहाय्य दिलेल्या काळात विद्यार्थ्यांनी उद्योजकीय आकांक्षेसाठी पूर्ण वेळ पाठपुरावा आवश्यक आहे

अर्ज करण्यासाठी - https://sarthi-maharashtragov.in/

इनक्युबेशन केंद्राचे नाव - जागा

- एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन, पुणे - १०

- उद्यम सोलापुर विद्यापीठ इनक्युबेशन सेंटर, सोलापूर - १०

- शिवाजी सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अॅन्ड लिंकेजेस, कोल्हापूर - १०

- मराठवाडा एक्सलरेटर फॉर ग्रोथ अॅन्ड इनक्युबेशन कॉंन्सिल, छत्रपती संभाजीनगर - १०

- नेत्ररित फाउंडेशन, सांगली - १०

- जी. एच. रायसोनी टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेटर फाउंडेशन, नागपूर - १०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT