Startup esakal
पुणे

Pune News : स्टार्टअपसाठी आता सारथीही करणार मदत

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) आता उद्योजकता विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे.

सम्राट कदम

पुणे - छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) आता उद्योजकता विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील भाऊ इनक्युबेशन संस्थेमार्फत सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास (इनक्युबेशन) योजना कार्यान्वित झाली आहे.

सारथीचे अध्यक्ष अज‍ित निंबाळकर आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, भाऊ इनक्युबेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोशी यांची प्रमुख उपस्थिती यावेळी लाभली.

संस्थेचे अध्यक्ष निंबाळकर म्हणाले, ‘उपक्रमाची ही सुरूवात असून, पुढे जाऊन संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याचा मानस आहे. तरी लक्षित गटातील विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.’ सारथी पुणे विभागीय कार्यालयाचे उपव्यवस्थापकीय संचालक अनिल पवार, संस्थेचे वरिष्ठ प्रकल्प संचालक भि. यो. बिरादार, संशोधन अधिकारी अमर पाटील, संशोधन नवनाथ चव्हाण, संगणक सल्लागार किशोर ढोकरे, भाऊ इनक्युबेटर्स सेंटरचे एजीएम गिरीश देगावकर, प्रशांत खरांगटे आदी उपस्थित होते. उपक्रमामध्ये निवड झालेल्या आठ लाभार्थ्यांनी त्यांच्या स्टार्टअप विषयी सादरीकरण केले.

इनक्युबेशन केंद्राविषयी थोडक्यात -

योजना कुणासाठी?

राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या गटातील नवोदित तरून विद्यार्थी किंवा नवोद्योजकांसाठी

कशी होणार निवड?

ज्यांच्याकडे व्यवसाय कल्पना आहे. त्याला अंतिम स्वरूप देऊन नविन व्यवसाय निर्मिती करू शकेल अशा १० लाभार्थ्यांची निवड

अर्थसाहाय्य किती मिळणार?

एका वर्षासाठी २५ हजार रुपये प्रति महिना आर्थिक साहाय्य देणार

सुविधा काय मिळणार ?

सारथी संस्थेने निवड केलेल्या नवउद्योजकांना भाऊ इनक्युबेटर्स सेंटर मध्ये एक वर्षाकरिता मार्गदर्शनासाठी पाठविले जाईल. केंद्रातील कार्यालयीन जागा, तत्रज्ञान, प्रशासकीय साहाय्य सॉफ्टवेअर, मिटींग हॉल, तज्ञांचे मार्गदर्शन अशा विविध बाबी उपलब्ध होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT