सारोळा कासारला वीजचोरी उघड
महावितरणच्या भरारी पथकाची कारवाई; सव्वालाख रुपयांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
नगर तालुका, ता.२२ ः सारोळा कासार येथे महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई करत वीजचोरीचा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी विलास मच्छिंद्र पुंड (रा. सारोळा कासार) याच्याविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सारोळा कासार येथील सर्व्हे क्रमांक ७७ मधील जागेवर महावितरणच्या भरारी पथकाने छापा टाकला. वीजचोरी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. महावितरणच्या तपासणीत संबंधिताने मागील सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल ६ हजार ५४७ युनिट वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले. या वीजचोरीमुळे महावितरण कंपनीचे १ लाख १२ हजार ८३ रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. कारवाईनंतर आकारण्यात आलेले तडजोडीचे बिलही संबंधिताने भरले नसल्याचे पोलिसांत दाखल फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी महावितरणच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक बाळकृष्ण घारे (वय ४३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक शिवाजी माने करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.