पुणे

सारोळा येथे खुल्या व्यायाम साहित्याची दुरवस्था

CD

नसरापूर, ता. ३ : सारोळे (ता. भोर) येथे ग्रामस्थांना व्यायामासाठी आरोग्यदायी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा परिषद निधी मधून लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या खुल्या व्यायामशाळेची (ओपन जिम) ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे दुरवस्था झाली आहे. या जिम परिसरात स्वच्छतेचा अभाव, वाढलेले गवत, धुळीचा परिसर आणि देखभाली अभावी ही जिम वापराऐवजी कपडे वाळत घालण्याची जागा बनली आहे.
जिल्हा परिषद पुणे माध्यमातून अनेक गावांना ओपन जिमचे साहित्य मिळाले आहे. अनेक ठिकाणी हे साहित्य क्रिडांगण, बाग, मंदिर परिसरात किंवा रस्त्याच्याकडेच्या स्वच्छ भागात लावलेले आहे. त्याचा वापर तरुण वर्गाबरोबर ज्येष्ठ नागरीक देखिल आवर्जून करतात. सारोळा गावात मात्र हे व्यायाम साहित्य स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावले गेले आहे. त्याची देखभाल होत नाही. परिसरात वाढलेले गवत, साचलेला कचरा, व्यायामाच्या साहित्यावर धूळ-माती साचलेली दिसून येते. काही ठिकाणी साधनांवर गंज चढू लागला असून वेळेवर देखभाल न झाल्यास लाखोंचे साहित्य गंजून खराब होण्याची शक्यता आहे, विशेष म्हणजे गावातील अनेक ग्रामस्थांना ही खुली व्यायामशाळा उभारल्याचे माहितीच नसल्याचे ग्रामस्थांशी चर्चा करताना निदर्शनास आले.

सारोळे ग्रामपंचायतीकडून कोणतीही नियमित देखरेख किंवा स्वच्छता राबवली जात नसल्यामुळे ही सुविधा नावापुरतीच उरली आहे. जिमभोवती कुंपण किंवा सुरक्षित गेट नसल्याने जनावरे, मोकाट कुत्री मुक्तपणे फिरताना दिसतात, त्यामुळे साहित्याचे नुकसान होत आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेली ही सुविधा जपण्याची जबाबदारी कोणाची? हा प्रश्‍न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
हा आरोग्यवर्धक उपक्रम सुरू राहण्यासाठी तातडीने परिसराची स्वच्छता करावी, कुंपन व सुरक्षित गेट बसवावे आणि नियमित देखरेखीची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.
याबाबत सारोळा गावचे ग्राम अधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले, ‘‘ओपन जिमसाठी गावात इतरत्र प्रशस्त जागा नसल्याने नदी परिसरात जिमसाहित्य बसविले आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी चांगला रस्ता देखिल आहे मात्र वापर कमी असल्याने दुरवस्था झाली आहे. गैरवापर करणाऱ्या नागरिकांना समज देऊन त्या ठिकाणी तातडीने स्वच्छता करून निधी उपलब्ध होताच तारेचे कंपाउंड करण्यात येईल, तरुणांनी या जिमचा वापर करावा.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उमरासाठी जायचंय! दोनदा विमान रद्द झालं, पण आज जाणारच; तरुणाचा VIDEO व्हायरल

Yermala Crime : चोराखळी येथे कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा; पिस्तूल–सुरे दाखवून ९.५१ लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime News : तरूणपणी केला गुन्हा, म्हातारपणी झाली अटक; पोलिसांच्या जाळ्यात ३० वर्षांनतर असा अडकला फरार आरोपी

Nashik Municipal Budget : नाशिक मनपाचे ३०११ कोटींचे 'सिंहस्थ' बजेट सादर; करवाढ नाही, पण जाहिरात महागली!

Phulambri News : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT